डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दक्षिण सोलापूर दौरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दक्षिण सोलापूर दौरा (२४ जानेवारी १९३७) कुंभारी या गावातील वास्तूला (तक्का-तख्त ) भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या स्वतंत्र मजूर पक्ष्याचा प्रचार करण्यासाठी २४ जानेवारी इ.स. १९३७ रोजी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप, कुंभारी व वळसंग या महत्त्वाच्या गावामध्ये येऊन गेले. कारण १९३५ च्या भारत सरकार कायद्यानुसार १९३७ मध्ये भारतातील वेगवेगळ्या प्रांतात प्रांतिक निवडणूका होणार होत्या, त्यानुसार तत्कालीन मुंबई प्रांतातही या निवडणूका होणार होत्या. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या स्वतंत्र मजूर पक्ष्याचे उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी उभे केले होते. सोलापूर उत्तर भाग मतदार संघातून स्वतंत्र मजूर पक्ष्यातर्फे जिवाप्पा ऐदाळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा प्रचार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यानुसार २४ जानेवारी १९३७ रोजी सकाळी ठीक ७ वाजता डॉ. आंबेडकर सोलापूर रेल्वे स्टेशनवर पोहोचले. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी जवळपास ५-६ हजार लोक उपस्थित होते.

हे सुद्धा पहा[संपादन]