कोकण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


कोकण विभागातील जिल्हे दर्शवणारा नकाशा

भारताचाकोकण म्हनला कि आपल्या सगळ्यांसमोरउभारतो तो स्वचांदा सागरी किनारा . पश्विम किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रातगोव्यात कोकण म्हणून ओळखला जातो. याच पट्ट्याला दक्षिणेत, म्हणजे कर्नाटककेरळ मध्ये मलबार किनारा म्हणून ओळखतात. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती... असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच स्थित आहे.

इतिहास[संपादन]

प्राचीन व पौराणिक[संपादन]

समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र

पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णुचा सहावा अवतार असलेल्या श्री परशूरामाने केली. परशूरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्र केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वत: परशूराम दक्षिण पर्वतांवर निघुन गेले व तेथे त्यांनी शूर्पारक देशाची निर्मीती सागरा पासुन केली असा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वात आढळतो.

पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वत:च्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचा निश्चय केला आणि त्या प्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशूरामाच्या बाणाच्या टप्प्या पर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशूरामाने सह्याद्री वरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्या नंतर परशूराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले.

कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मीती देखिल परशूरामाने केली [१] अशी पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. यातील काही ब्राम्हणास चितेतून पुन्हा जीवदान देवून पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांना चित्पावन असे संबोधतात. गौड सारस्वत [२] व केरळ मधील नंबूथिरी [३] ब्राम्हणांच्या उगमा संदर्भात देखिल याच प्रकारच्या परशूराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात अनेक ठिकाणी या आख्यायिकेला अनुरूप असे पुरावे सापडतात. रत्‍नागिरी जिल्ह्यात चिपळूण जवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशूराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशूराम मंदिर आहे.

मध्ययुगीन[संपादन]

आजचे कोकण[संपादन]

कोकण विभागाची संरचना[संपादन]

राजकीय[संपादन]

महाराष्ट्राच्या सहा प्रशासकीय विभागांपैकी कोकण विभाग [१] हा एक आहे. या विभागात सहा जिल्हे व ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीचा समावेष होतो.

भौगोलिक[संपादन]

सामाजिक[संपादन]

प्रमुख आकर्षणे[संपादन]

याला कड्यावरचा गणपती म्हणतात.

# पाली (रायगड) अष्टविनायक

  1. मह्ड (रायगड) अष्टविनायक
  2. हेदवीचा दशभुजा गणेश
  3. रेडीचा गणपती
  4. दीवेआगरचा सुवर्णगणेश्.

थंड हवेची ठिकाणे

बाह्य दुवे[संपादन]


महाराष्ट्र
Maha div.png
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. कोकणस्थ.कॉम
 2. गोवाटुरीझम.कॉम
 3. इंग्लिश विकिपीडियावरील नंबुदीरी