गर्जा महाराष्ट्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गर्जा महाराष्ट्र
दूरचित्रवाहिनी सोनी मराठी
भाषा मराठी
प्रकार ऐतिहासिक, महाराष्ट्रीय
देश भारत
सूत्रधार जितेंद्र जोशी
शीर्षकगीत/संगीत माहिती
शीर्षकगीत गर्जा महाराष्ट्र माझा
प्रसारण माहिती
पहिला भाग २५ ऑगस्ट २०१८
अंतिम भाग १६ फेब्रवारी २०१९
एकूण भाग २६
वर्ष संख्या २०१८ - २०१९
निर्मिती माहिती
कथा संकलन वैभव छाया (भाग १५)
कालावधी ३० मिनिटे

गर्जा महाराष्ट्र ही २५ ऑगस्ट २०१८ ते १६ फेब्रवारी या कालावधी दरम्यान सोनी मराठी दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित झालेली एक मराठी मालिका होती. ही मालिका दर शुक्रवारी प्रक्षेपित होत असे. अभिनेता जितेंद्र जोशी या मालिकेचे सूत्रसंचालक आहेत. गर्जा महाराष्ट्र मालिकेचे एकूण २६ भाग (एपिसोड) होते, प्रत्येक भागात एक-एक अशा एकूण २६ उल्लेखनीय महाराष्ट्रीय व्यक्तींच्या जीवनकथा प्रदर्शित करण्यात आल्या.

या अशा महाराष्ट्रीय व्यक्तीं होत्या की, ज्यांनी केवळ महाराष्ट्राचीच सांस्कृतिक ओळख आकारली नाही तर भारताच्या सांस्कृतिक विकासाचा मार्ग सुद्धा प्रशस्त केला. देशाला आकार देण्यात या महाराष्ट्रीयांनी जे सांस्कृतिक आणि बौद्धिक योगदान दिले, त्याचा इतिहास या मालिकेतून कालानुक्रमाने मांडला गेला आहे. या महाराष्ट्रीयांमध्ये संत, समाजसुधारक, राजकारणी आदींचा समावेश होता.[१]

कलाकार[संपादन]

कलाकार व त्यांची भूमिका

भाग[संपादन]

भाग क्रमांक भागाचे नाव प्रक्षेपित केल्याचा दिनांक
०१ संत ज्ञानेश्वर २५ ऑगस्ट २०१८[२]
०२ संत तुकाराम १ सप्टेंबर २०१८
०३ शिवाजी महाराज ८ सप्टेंबर २०१८
०४ बाजीराव पहिला १५ सप्टेंबर २०१८
०५ जोतीराव फुले २२ सप्टेंबर २०१८
०६ बाळ गंगाधर टिळक २९ सप्टेंबर २०१८
०७ गोपाळ गणेश आगरकर ६ ऑक्टोबर २०१८
०८ रखमाबाई १३ ऑक्टोबर २०१८
०९ जगन्नाथ शंकरशेठ २० ऑक्टोबर २०१८
१० विष्णूदास भावे २७ ऑक्टोबर २०१८
११ शाहू महाराज ३ नोव्हेंबर २०१८
१२ हिराबाई पेडणेकर १० नोव्हेंबर २०१८
१३ संत गाडगे बाबा १७ नोव्हेंबर २०१८
१४ रघुनाथ धोंडो कर्वे २४ नोव्हेंबर २०१८
१५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ डिसेंबर २०१८
१६ विश्राम घोले ८ डिसेंबर २०१८
१७ दादासाहेब फाळके १५ डिसेंबर २०१८
१८ कर्मवीर भाऊराव पाटील २२ डिसेंबर २०१८
१९ पांडुरंग सदाशिव साने २९ डिसेंबर २०१८
२० शिवकर बापूजी तळपदे ५ जानेवारी २०१९
२१ विनायक दामोदर सावरकर १२ जानेवारी २०१९
२२ विष्णुपंत मोरेश्वर छत्रे २६ जानेवारी २०१९
२३ विष्णू दिगंबर पलुसकर १९ जानेवारी २०१९
२४ २ फेब्रुवारी २०१९
२५ ९ फेब्रुवारी २०१९
२६ १६ फेब्रुवारी २०१९

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]