डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर
Dr. Babasaheb Ambedkar International Airport, Nagpur
NagpurAirport.JPG
आहसंवि: NAGआप्रविको: VANP
NAG is located in महाराष्ट्र
NAG
NAG
नागपूर विमानतळाचे महाराष्ट्रातील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ नागपूर
समुद्रसपाटीपासून उंची १,०३३ फू / ३१५ मी
गुणक (भौगोलिक) 21°05′32″N 079°02′50″E / 21.09222°N 79.04722°E / 21.09222; 79.04722
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ ६,३५८ १,९३८ डांबरी धावपट्टी
१४/३२ १०,५०० ३,२०० डांबरी धावपट्टी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: NAGआप्रविको: VANP) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथील विमानतळ आहे. यास सोनेगांव विमानतळ असेही म्हणतात. हा महाराष्ट्रातील १८ विमानतळांपैकी एक आहे. येथून मुंबईदिल्लीसह भारतातील अनेक मोठी शहरे तसेच शारजा, दुबई आणि दोहा येथे विमाने जातात-येतात.

येथे नुकतीच इंड्रा ही रडार प्रणाली लावण्यात आली आहे.अशी प्रणाली लागणारे हे भारतातील पहिले शहर आहे.नागपूरचे आकाशातून दररोज सुमारे ६५० विमानांची ये-जा असते.[१]

भारताच्या पंतप्रधान कार्यालयाने महाराष्ट्रातील तीन विमानतळांना मंजूरी दिली आहे.त्यात नागपूर विमानतळाचे नाव आहे.भारताच्या संरक्षण खात्याच्या मालकिची असलेली गजराज प्रकल्प साठी पूर्वी निर्धारीत केलेली २७८ हेक्टर जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणकडे हस्तांतरीत करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.त्यामुळे मिहान प्रकल्पाचा व नागपूर विमानतळ आधुनिकिकरण व विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे.याद्वारे नागपूर विमानतळाचा परिसर १ लाख ४०० हेक्टरपर्यंत वाढेल.या विमानतळाव्रर दुसरी नविन धावपट्टी ही ४००० मीटर लांब व ६० मीटर रुंद राहील.मंत्रीमंडळाच्या निश्चितीनंतर यावर शिक्कामोर्तब होईल.[२]

या विमानतळास, भारताच्या नागरी उड्डयन महासंचालक कार्यालयाद्वारे नुकताच संकेत 'ई' (कोड-ई) हा दर्जा देण्यात आलेला आहे. याद्वारे बोईंग ७७७, बोईंग ७४७, बोईंग ७८७ या श्रेणीची महाकाय विमानेही येथे उतरु शकतील. येथे एअर इंडियाचा एमआरओ देखील तयार झाला आहे.[३]

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान 
एर अरेबिया शारजा
एर इंडिया स्थानिक बंगलोर,चेन्नई,हैदराबाद, कोलकाता
इंडियन एरलाईन्स दिल्ली,मुंबई, रायपूर
इंडिगो दिल्ली,मुंबई,कोलकाता, पुणे
जेट एरवेज मुंबई
जेटलाईट ईंदूर, मुंबई
किंगफिशर एरलाईन्स ईंदूर,बंगलोर,गोवा,हैदराबाद,मुंबई, पुणे
गोएर दिल्ली,मुंबई,नांदेड

हे सुद्धा पहा[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. टाइम्स ऑफ इंडियातील लेख दि.१६/१०/२०१३ रोजी १६.५० वाजता जसे दिसले तसे.
  2. लोकमत नागपूर दि.१४/११/२०१३ पान क्र. १, (मथळा-नागपूर विमानतळ मार्गी लागणार) दि.१४/११/२०१३ रोजी ०९.५८ वाजता जसे दिसले तसे.
  3. तरुण भारत, नागपूर ,ई-पेपर,आपलं नागपूर पुरवणी पान क्र. ११ नागपूर विमानतळावर एअरफिल्ड क्रॅश फायर टेंडर. श्री नरकेसरी प्रकाशन लि. ०९/०२/२०१७. दि. ०९/०२/२०१७ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.