रामानंद पंथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वामी रामानंदाचार्य (इ.स. १०१७ - इ.स.११३७)

रामानंद पंथ किंवा रामानंद संप्रदाय हा एक हिंदू धर्मातील वैष्णव संप्रदाय असून याची स्थापना स्वामी रामानंदाचार्य यांनी केली. याला श्री संप्रदाय असे सुद्धा म्हटले जाते. येथे श्री म्हणजे सीता माता जी मुळात लक्ष्मीदेवीचा एक अवतार आहे. रामानंद पंथ हा विशिष्टाद्वैत वादावर अवलंबून आहे.

विशिष्टाद्वैत या शब्दाचे संस्कृत विश्लेषण विशिष्टंचा विशिष्टंच विशिष्टे, विशिष्टयोरद्वैते विशिष्टाद्वैतम् असे असून, त्याचा मराठी अर्थ जीव आणि आत्मा हे ब्रह्मा पासून भिन्न असून भिन्नपणे कार्यरत असले तरी त्यांचा आणि ब्रह्माचा तोच संबंध आहे जो सूर्य आणि त्याच्या किरणांचा आहे.

उत्पत्तीची कथा[संपादन]

स्वामी रामानंद हे एकदा तीर्थयात्रा करून घरी आले आणि गुरूमठ येथे पोहोचले तेव्हा त्यांच्या गुरुबंधूंनी त्यांच्याबरोबर जेवण करण्यास नकार दिला. रामानंद यांनी तीर्थक्षेत्राशी संबंधित असलेल्या अस्पृश्यतेचा विचार केला नाही असा त्यांचा अंदाज होता. आपल्या शिष्यांचा हा विरोध पाहून राघवानंदांनी रामनंदांना नवीन पंथ सुरू करण्याचा सल्ला दिला आणि येथूनच रामानंद संप्रदायाचा जन्म झाला.

वैशिष्ट्य[संपादन]

  1. परमेश्वर श्रीराम हे परमोपास्य दैवत आहेत.
  2. 'ओम रामाय नमः' हा या संप्रदायाचा प्रमुख मंत्र आहे.
  3. 'श्री संप्रदाय' किंवा 'रामानंद संप्रदाय' किंवा 'वैरागी संप्रदाय' असे या संप्रदायाचे नाव आहे.
  4. या पंथात नीतिमत्तेवर फारसा जोर दिला जात नाही. तसेच कर्मकांडाचे महत्त्व येथे फारच कमी आहे.
  5. या पंथात शुक्लश्री, बिंदश्री, रक्षाश्री, लस्कर अशा अनेक प्रकारचे टिळे प्रचलित आहेत.