एबीपी माझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एबीपी माझा
सुरुवात१९ मे इ.स. २००४
नेटवर्कस्टार टीव्ही
मालक स्टार टीव्ही, एबीपी टीव्ही
प्रेक्षक_संख्या25,000,000 (, )
ब्रीदवाक्य उघडा डोळे, बघा नीट
देशभारत
प्रसारण क्षेत्रभारत
मुख्यालयमहालक्ष्मी, मुंबई-११
जुने नावस्टार माझा
भगिनी वाहिनीएबीपी न्यूज़, स्टार टीव्ही च्या सर्व वाहिन्या
प्रसारण वेळ२४ तास
संकेतस्थळmarathi,abplive.com

एबीपी माझा ही पश्चिम बंगालच्या आनंद बाझार पत्रिका (एबीपी)' या वृत्तसमूहाची २४ तास मराठी बातम्या देणारी वृ्त्तवाहिनी आहे. या वृ्त्तवाहिनीची सुरुवात २२ जून इ.स. २००७ रोजी झाली. या वृत्तवाहिनीचे जूने नाव 'स्टार माझा' होते.

इतिहास[संपादन]

स्टार ग्रुप आणि भारतीय आनंद बझार पत्रिका या दोन संस्थांनी ३१ मार्च इ.स. २००३ रोजी या वाहिनीची स्टार माझा या नावाने सुरुवात केली. ही वाहिनी मीडिया कन्टेन्ट ॲंन्ड कम्युनिकेशन्स सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमसीसीएस) या कंपनीच्या अखत्यारीत चालते. एमसीसीएस एबीपी टीव्ही आणि स्टार न्यूज ब्रॉडकास्टिंग लिमिटेड या दोन कंपन्याच्या ७४:२६ भागीदारीत चालते.

भारतातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठित वृ्त्तसमूहांमध्ये आनंद बझार पत्रिका ग्रुपची गणना होते. पूर्व भारतामध्ये या समूहाची अनेक प्रकाशने आहेत, आनंद बझार पत्रिका हे बंगाली भाषेतील सर्वाधिक खपाचे दैनिक आणि द टेलिग्राफ हे पूर्व भारतात सर्वाधिक खपणारे इंग्रजी दैनिक याच समूहाच्या मालकीचे आहे. द स्टार ग्रुप हा अशियातील अग्रगण्य मीडिया ग्रुप आहे. अशियामध्ये स्टारच्या पन्नास वाहिन्या ९ भाषांतून ५३ देशातील सुमारे ३० कोटी प्रेक्षकांपर्यंत पोचतात.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


देशातील पहिली वृत्तवाहिनी स्टार न्यूज, बंगाली भाषेतील पहिली २४ तासांची राष्ट्रीय वृत्तवाहिनी स्टार आनंद, आणि स्टार न्यूज हे हिंदी भाषेतील देशातील वृत्तवाहिनी आहे.

जून इ.स. २००५ मध्ये एमसीसीएसने स्टार आनंदा सुरू केले आणि पहिलेपणाची मूहूर्तमेढ रोवण्याच्या परंपरेत आणखी एकाची भर पडली. प्रक्षेपणाच्या पहिल्या दिवसापासूनच स्टार आनंदाने बंगालमध्ये एक नवा इतिहास रचला. बंगालमधील त्याच परंपरेची आता स्टार माझा महाराष्ट्रात पुनरावृत्ती करत आहे.

बाह्य दुवे[संपादन]