प्रेम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रेम म्हणजे स्नेह, आपुलकी, जिव्हाळ्याची तीव्र भावना होय. मनातुन मनाला कळणारी म्हणजे प्रेमाची भावना.....!!! प्रेम या जगातील सगळ्यात सुंदर कलपना आहे, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीना कधी कोणावर तरी प्रेम करतच असत, प्रेमात पडल्यावर हे जग खुप छान वाटत कसलाच राग नाही येत इतर वेळी न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला आवडू लागतात का तर त्या गोष्टी त्याला किंवा तिला आवडतात म्हणून .स्वप्नच्याच दुनियेत आपण रंगून जातो झोपतानाच नाही तर जागेपणी देखील आपण त्याचे किंवा तिचे स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नांमद्ये जगतो सुद्धा...

प्रेमामुळे अशक्य गोष्टीही शक्य वाटू लागतात. प्रेमात पडलेला माणूस हा चारचौघांच्यात ओळखून येतो. प्रेमाला परिभाषा नसते. प्रेमात दोन मन एकमेकांच्या जवळ येतात. प्रेमात असलेल्या माणसाला सगळी दुनियाच प्रेमाच्या नशेत गुलाबी झालेली दिसते. प्रेम हे ठरवून केल जात नाही. प्रेमात पडायची वेळ हि कधीच सांगून येत नाही, पण जेव्हा येते तेव्हा आपल संपूर्ण जगच बदलून जात. प्

पण आजकालच्या या जगात खर प्रेम हे क्वचितच पाहायला मिळत

प्रेमाची काही स्वरुपे[संपादन]

प्रेमाची वयोगटानुसार स्वरूपे: १) स्नेह - प्रेमाचा हा प्रकार आपण आपल्याहून वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीसोबत ठेवतो. यात एक काळजी किंवा माया असते. भूतदया किंवा पशुपक्षांबद्दल वाटणारी आपुलकी हीसुद्धा ह्यात मोडते. २) प्रेम - हा समान वयोगटातील व्यक्तींच्या दरम्यान असणाऱ्या संबंधांना दर्शवितो - ह्याचे उपप्रकार म्हणजे पत्नीप्रेम, भागीनिप्रेम, बंधुप्रेम, मित्रप्रेम इत्यादी. ३) आदर - हा प्रेमाचा प्रकार आपल्याहून वयाने मोठ्या अथवा ज्येष्ठ व्यक्तींकरता असतो. ह्यातही संबंधित व्यक्तीची वाटणारी काळजी - विशेषतः त्यांच्या आवडी-निवडी व विचारांची ठेवतात. ही वागणूक त्यांच्या जीवनाच्या अनुभवाची आणि त्यांनी आपल्या केलेल्या संगोपनाबद्दलची एक पावती आणि क्वचित प्रसंगी त्यांना आवडणार्या शिस्तबद्ध दिनचर्येची दखल असू शकते. पण हे सर्व प्रेमच! ४) ममता - हा तो प्रेमप्रकार की ज्याला अनुभवायला असे म्हणतात की देवही अवतार घेतात. स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले की आपल्या बाळासाठी वाटणारे प्रेम म्हणजे ममता होय. ५) भक्ती - प्रेमाचे परमोच्च रूप की ज्याचे वर्णन केवळ अशक्य. परमेश्वर आणि साधक जेंव्हा एकरूप होतात तेंव्हा जो प्रेमप्रकार घडतो तो म्हणजे भक्ती - भक्ती म्हणजेच एकरूपता. भिन्नता म्हणजे विभक्ती- परमेश्वर आणि भक्त दोघेही एकरूप होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परमोच्च एकरूपता अनुभवतात त्यासच भक्ती असे संबोधन आहे.

हे शिकवले भारताने जगाला! नुसतेच लव्ह लव्ह म्हणतात बापडे पण त्यांना प्रेमाची व्याख्याही नाही कळत. वासनेला प्रेम समजून इतर प्रेमप्रकाराकडे संपूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या समाजाला प्रगल्भ किंवा सुसंस्कृत म्हणायचे की भारताला? अजय गुरुबा

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: