रावसाहेब कसबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. रावसाहेब राणोजी कसबे (जन्म- नोव्हेंबर १२, १९४४) हे महाराष्ट्रातील एक तथाकथित विचारवंत आहेत. ते एक शिक्षणतज्‍ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या झोत या पुस्तकात त्यांनी माधव सदाशिव गोळवलकर यांच्या The Bunch of Thoughts या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची समीक्षा केली आहे.

रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना
 • आंबेडकर आणि मार्क्स
 • आंबेडकर वाद - तत्त्व आणि व्यवहार
 • झोत
 • धर्मग्रंथ आणि मानवी जीवन
 • मानव आणि धर्मचिंतन
 • भक्ती आणि धम्म
 • हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद

रावसाहेब कसबे यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार[संपादन]

 • गदिमा प्रतिष्ठानचा स्नेहबंध पुरस्कार (२०११)
 • मिलिंद कला महाविद्यालयातर्फे मिलिंद समता पुरस्कार (२०१४)
 • रावसाहेब कसबे हे नाशिकमध्ये भरलेल्या पाचव्या "कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे‘ अध्यक्ष होते. (४-५ जानेवारी २०१४)
 • सुगावा प्रकाशनाचा ’सुगावा पुरस्कार’ (२०१४)
 • रावसाहेब कसबे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २०११ ते २०१६ या काळासाठीचे दोघांतले एक उपाध्यक्ष आहेत. (दुसरे चंद्रकांत शेवाळे)
 • २०१५ सालच्या ५व्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

संदर्भ[संपादन]

 • झोत सुगावा प्रकाशन, पुणे. लेखक परिचय.