लॉर्ड वेव्हेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लॉर्ड वेव्हेल(जन्म ५ मे, इ.स. १९८३, मृत्यू-(२४ मे,इ.स. १९५०) हे ब्रिटीश भारताचे गव्हर्नर जनरल होते.
कारकीर्द- १ ऑक्टोबर ,इस. १९४३ ते २१ फेब्रुवारी इ.स. १९४७

दुसऱ्या महायुद्धावेळी दिल्ली येथे लॉर्डवेव्हेल

ऑक्टोबर, १९४३ मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली. वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त झाले. वेव्हेलने राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी जून १९४५ मध्ये सर्वपक्षीय बठक सिमला येथे बोलवली. इंग्लंडच्या मजूर पक्षाने भारतात १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन पाठविले. कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने निवडणुका होऊन २ सप्टेंबर, १९४६ रोजी नेहरूंचे हंगामी सरकार स्थापन झाले. भारतात घटना समितीच्या बैठकांस सुरुवात झाली. आझाद हिंदी सेनेच्या सनिकांच्या फाशीच्या शिक्षा जनमताच्या दबावामुळे व्हाइसरॉय वेव्हेलला रद्द कराव्या लागल्या. पंतप्रधान अ‍ॅटलीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला.