देव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
Disambig-dark.svg
हेसुद्धा पाहा: ईश्वर आणि भगवान


अनेक धर्मांच्या विश्वासानुसार देव ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/संकल्पना आहे. विविध धर्मांत देव या संकल्पनेविषयी मूलभूत फरकही आहेत. हिंदू धर्मात देव, देवता, दैवत, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा, ब्रह्म इत्यादी संकल्पना आहेत. ख्रिस्ती धर्मग्रंथ बायबलमध्ये देवाला सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ म्हटले आहे.

देव नावाची माणसे[संपादन]

वि.कृ.श्रोत्रिय यांनी १९३७ साली लिहिलेल्या वेदांतील गोष्टी या पुस्तकातले पहिले वाक्य आहे.."फार प्राचीन काळी आपल्या देशात देव नावाचे लोक राहात असत."..

संत तुकाराम[संपादन]

तुकारामाच्या मते - देह देवाचे मंदीर । आत आत्मा परमेश्वर॥

चार्वाकाचा देव[संपादन]

यावज्जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ।।

जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मजॆत जगा, वेळप्रसंगी कर्ज काढून तूप प्या, एकदा का देह चितेमध्ये भस्म झाला की संपले, तो देह परत कुठून येणार?.

आईनस्टाईनचा देव[संपादन]

अमेरिकेतील अनेक विद्यापीठांत भरणाऱ्या वैज्ञानिक संमेलनांत हजर रहाताना आईनस्टाईनला एका प्रश्नास हटकून तोंड द्यावे लागे, आणि तो म्हणजे "तुमचा देवावर विश्वास आहे का? Do you believe in God ?" आणि तो नेहमी उत्तर द्यायचा 'हो,स्पिनोझाच्या देवावर माझा विश्वास आहे!"

स्पिनोझाचा देव[संपादन]

डच तत्त्वज्ञ बरुच डी स्पिनोझा हा सतराव्या शतकातील ॲमस्टरडॅम येथील एका यशस्वी पण फार श्रीमंत नसणाऱ्या उद्योजकाचा मुलगा होता. त्याची देवाविषयीची कलपना अशी होती :-

देव असे म्हणत असणार,"उगीचच आपले उर बडवीत माझी प्रार्थना व पूजा करू नका. उलट जरा बाहेर नजर टाका आणि मी तुमच्यासाठी काय काय केले आहे त्याचा उपभोग घ्या. तुम्ही मौज करावी, गाणी म्हणावीत मी तुमच्यासाठी जे निर्माण केले आहे त्याचा उपभोग घ्या आणि त्याची मजा लुटा. ज्याला तुम्ही माझे घर समजतां, त्या अंधुक प्रकाशाने भरलेल्या, थंड,उदास देवळात जायचा विचारही करू नका. माझे घर मोठमोठ्या पर्वतशिखरात,झुळझुळ वाहाणाऱ्या नद्यांत,सरोवरात, अफाट पसरलेल्या समुद्रकिनाऱ्यावर आहे. आपले आयुष्य जर दुःखी असेल तर त्याबद्दल मला दोष देणे बंद करा. तुम्ही पापी आहात असे मी कधीच म्हणत नाही. उगीचच मनात भीती बाळगू नका. मी काही तुमच्या कृत्यांचा जाब विचारायला बसलो नाही.त्यामुळे तुमच्यावर टीका करायचा किंवा तुमच्यावर रागावण्याचा विचारही माझ्या मनात येत नाही. मला कशाचेच सोयर सुतक नाही,तुम्हाला शिक्षा करायला मी बसलो नाही. मी म्हणजे केवळ प्रेमाचा सागर आहे.

उगीचच माझ्याकडून क्षमायाचना करू नका.क्षमा करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? तुमच्या भावना, आकांक्षा,आनंद. गरजा, मर्यादा, वर्तनातील विसंगती या सर्व तुमच्या ठायी मीच निर्माण केलेल्या असताना, त्याबद्दल मी तुम्हाला कसा दोष देणार आणि तुम्हाला कशी शिक्षा करणार? तुम्हीच माझी सर्व लेकरे आहात. जी अयोग्य वागतील त्याना पुढील अनंत काळापर्यंत उकळत्या तेलात किंवा धगधगत्या ज्वाळांत टाकण्याची शिक्षा देण्यासाठी एकादी जागा मी तयार केली आहे असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे.

माझ्या काही आज्ञा किंवा कायदे आहेत असे मुळीच समजू नका. त्यामुळे तुमच्या मनात उगीचच अपराधीपणाची जाणीव त्यामुळे निर्माण होते. आपल्याला त्रास होऊ नये असे ज्यामुळे तुम्हास वाटते तो उपद्रव आपल्यामुळेही इतरांना होणार नाही याची कालजी घ्या. फक्त एकच गोष्ट मला अपेक्षित आहे, ती म्हणजे केवळ आपल्या आयुष्याविषयी दक्ष रहा. ही दक्षताच तुमची मार्गदर्शक आहे. हे आयुष्य म्हणजेच सर्व काही आहे, आणि तेवढेच तुम्हाला आवश्यक आहे. मी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे .त्यात तुम्हाला काही बक्षीस मिळणार नाही, की शिक्षाही होणार नाही. पाप किंवा पुण्य असे काही नसते, तुमच्या जीवनाचा स्वर्ग किंवा नरक बनवण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे.

या आयुष्यानंतर पुढे काही आहे की नाही हे मी सांगणार नाही, पण यानंतर असे काही नाही असे समजूनच चाला. जे काही आनंद उपभोगणे, प्रेम करणे करायचे आहे त्यासाठी हीच एक संधी आहे. तुमची काही तक्रार नसेल तर मी दिलेल्या संधीचा तुम्ही पूर्ण फायदा घेतलात, असे मी समजेन. आणि काही असेलच तरी मी काही तुम्हाला विचारणार नाही की, तुम्ही चांगले वागलात किंवा नाही. मी फक्त विचारेन की तुम्ही आयुष्याचा आनंद लुटलांत की नाही? तुम्हाला ते आवडले की नाही?.मजा आली का तुम्हाला? त्यात जास्त मौज कशात आली? तुम्ही काय शिकलात?

माझ्यावर विश्वास टाकून निष्क्रिय राहणे सोडा, कारण तसे करणे म्हणजे काहीतरी अध्याहृत धरणे, कल्पना करणे. आपल्या छोट्या मुलीबरोबर तुम्ही खेळत असाल, किंवा आपल्या कुत्र्याच्या पिल्लाला कुरवाळत असाल, किंवा समुद्रात स्नान करत असाल तेव्हा माझी जाणीव तुम्हास व्हावी.

माझी स्तुती करण्याचे कारण नाही. स्वतःला कुणीतरी मोठा समजणारा प्राणी मी आहे असे का वाटते तुम्हाला? तुमच्या स्तुतिस्तोत्रांनी मला अगदी कंटाळा येतो. माझ्याविषयी इतके खरेच वाटत असेल तर ते प्रत्यक्ष स्वतःची, सभोवतालच्या जगाची काळजी घेऊन व्यक्त करा. तुमचा आनंद व्यक्त करा. ती माझी खरी स्तुति ठरेल.ए कच सत्य आहे ते म्हणजे तुम्ही येथे आहात, आणि हे जग अनेक आश्चर्यांनी भरलेले आहे. आणखी मग काय हवे तुम्हाला? आणखी स्पष्टीकरणाची आवश्यकताच काय? मी कोठेतरी बाहेर आहे असे समजून मला शोधू नका, तुमच्या आत मी आहे हे निश्चित समजा. तुमच्या हृदयाच्या ठोक्यात मी आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]