भदंत आनंद कौसल्यायन
Appearance
भदंत आनंद कौसल्यायन | |
---|---|
जन्म |
५ जानेवारी इ.स. १९०५ सोहाना, जिल्हा अंबाला पंजाब(ब्रिटिश भारत) |
मृत्यू | २२ जून, १९८८ (वय ८३) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | लेखक, निबंधकार, बौद्ध धर्म |
विषय | पाली व बौद्ध धर्म |
प्रसिद्ध साहित्यकृती | यदि बाबा ना होते, कहॉं क्या देखा |
प्रभाव | राहुल सांकृत्यायन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन (५ जानेवारी इ.स. १९०५ - २२ जून इ.स. १९८८) हे एक भारतीय बौद्ध भिक्खू, लेखक व पाली भाषेचे विद्वान होते. ते आयुष्यभर हिंदी भाषेचा प्रचार करित राहिले. १० वर्ष राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धाचे प्रधानमंत्री राहिले. ते २०व्या शतकातील बौद्ध धर्माच्या सर्वश्रेष्ठ क्रियाशील व्यक्तिंमध्ये गणले जातात.
जीवन परिचय
[संपादन]त्यांचा जन्म ५ जानेवारी इ.स. १९०५ रोजी पंजाब प्रांतातील मोहाली जवळील सोहना या गावी खेत्री कुटुंबात झाला. त्यांचे वडील लाला रामशरणदास हे शिक्षक होते. त्यांचे लहानपणीचे नाव हरिनाम होते. इ.स. १९२० मध्ये भदंत दहावीची परीक्षा पास झाले. भदंत इ.स. १९२४ मध्ये १९ व्या वर्षी पदवी पास झाले. ते लाहोर मध्ये असतांना उर्दू भाषेत देखील लिहित असत.
लिखित ग्रंथ
[संपादन]- भिक्खु के पत्र
- जो भूल न सका
- आह! ऐसी दरिद्रता
- बहानेबाजी
- यदि बाबा न होते
- रेल के टिकट
- कहॉं क्या देखा
- संस्कृति
- देश की मिट्टी बुलाती है
- बौद्ध धर्म एक बुद्धिवादी अध्ययन
- श्रीलंका
- मनुस्मृति क्यों जलायी गई?
- भगवद्गीता की बुद्धिवादी समीक्षा
- राम कहानी राम की जबानी
- ऐन् इंटेलिजेण्ट मैन्स गाइड टू बुद्धिज्म (An Intelligent Man's Guide to Buddhism)
- धर्म के नाम पर
- भगवान बुद्ध और उनके अनुचर
- भगवान बुद्ध और उनके समकालीन भिक्षु
- बौद्ध धर्म का सार
- आवश्यक पालि