सचिन खेडेकर
सचिन खेडेकर | |
---|---|
![]() सचिन खेडेकर | |
जन्म |
सचिन खेडेकर Pune |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
सचिन खेडेकर मराठी व हिंदी भाषा चित्रपट तसेच नाटकांतून अभिनय करणारा अभिनेता आहे. ते मराठीतील एक नामवंत अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. अस्तित्व, इम्तेहान आणि श्याम बेनेगल यांच्या बोस: द फरगॉटन हिरो मधिल त्यांचा अभिनय विशेष वाखाणण्या जोगा आहे.
कारकीर्द[संपादन]
खेडेकर यांनी सुरुवात नाटकांपासुन केली.त्यानंतर ते चित्रपटांत काम करु लागले.[१] २००० मध्ये ते श्याम रंग नावाच्या नाटकात होते.[२]
दूरदर्शन[संपादन]
- इम्तिहान १९९४
- सैलाब १९९५
- थोडा हे थोडे कि जरूरत हे
- टिचर
- चाळ नावाची वाचाळ वस्ती(दूरदर्शन मालिका डी. डी सह्याद्री वाहिनी)
चित्रपट[संपादन]
- काकस्पर्श
- कोकणस्थ
- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
- प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
- आजचा दिवस माझा
- शिक्षणाच्या आईचा घो
- फक्त लढ म्हणा
पुरस्कार[संपादन]
सचिन खेडेकर यांना दूरदर्शनवर सैलाब या मलिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्क्रिन पुरस्कार मिळाला आहे. तसेच कदाचित आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटांसाठी देखील त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. बोस: द फरगॉटन हिरो या चित्रपटासाठी त्यांना ऐतिहासीक चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. घराबाहेर या चित्रपटासाठी त्यांना राज्य शासनाचा पूरस्कार मिळाला.
ई टी. वी. मराठी वरील कोण होइल मराठी करोडपती या कोन बनेगा करोडपती या हिंदी मलिकेवर आधारित असलेल्या मलिकेत सचिन सुत्रसंचालनाचे काम करणार आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
- ^ "Sachin Khedekar started as a theatre artist - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-04-15 रोजी पाहिले.
- ^ March 20; March 20, 2000 ISSUE DATE:; January 7, 2000UPDATED:; Ist, 2013 17:58. "Hindi play Shyam Rang in Mumbai; Games People Play and The Lover in Delhi". India Today (इंग्रजी भाषेत). 2019-04-15 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)