डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार
Appearance
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार | |
---|---|
प्रयोजन | सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान |
Venue | महाराष्ट्र |
देश | भारत |
प्रदानकर्ता | महाराष्ट्र शासन |
प्रथम पुरस्कार | २०१६ |
शेवटचा पुरस्कार | २०१६-१७ |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.[१][२][३]
इतिहास
[संपादन]इ.स. २०१६ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार इ.स. २०१७ मध्ये हा पुरस्कार राज्यभरातील १२५ स्त्री-पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला.[४][५][६]
हे सुद्धा पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार
संदर्भ
[संपादन]- ^ "सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार जाहीर". Lokmat. 2017-05-23. 2018-10-27 रोजी पाहिले.
- ^ "अशोककुमार चौधरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित". mahamtb.com (इंग्रजी भाषेत). 2018-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-27 रोजी पाहिले.
- ^ "'आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार'ला 'न्याय' कधी?". Loksatta. 2017-04-12. 2018-10-27 रोजी पाहिले.
- ^ "Dailyhunt". m.dailyhunt.in (इंग्रजी भाषेत). 2018-10-27 रोजी पाहिले.
- ^ "करुणा चिमणकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार". www.bytesofindia.com. 2018-10-27 रोजी पाहिले.
- ^ "Dr. Babasaheb Ambedkar Samajotthan Puraskaar & Shahu Phule Ambedkar Awards" (इंग्रजी भाषेत). 2018-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-27 रोजी पाहिले.