चित्तरंजन दास
Jump to navigation
Jump to search
चित्तरंजन दास | |
---|---|
देशबंधू चित्तरंजन दास | |
टोपणनाव: | देशबंधू |
जन्म: | नोव्हेंबर ५, १८७० |
मृत्यू: | जून १६, १९२५ |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना: | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
धर्म: | हिंदू |
वडील: | भुबनमोहन दास |
पत्नी: | बसंती देवी |
अपत्ये: | सिद्धार्थ शंकर राय मंजुला बोस |
चित्तरंजन दास (बंगाली: চিত্তরঞ্জন দাস; उच्चार: चित्तोरोंजोन दाश) (नोव्हेंबर ५, १८७० - जून १६, १९२५) हे एक बंगाली वकील व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी पुढारी होते. त्यांना देशबंधू असे संबोधले जात असे.
श्रीअरविंद घोष व चित्तरंजन दास[संपादन]
अरविंद घोष यांना जेव्हा इ.स. १९०७ मध्ये अटक झाली तेव्हा दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना देशबंधू चित्तरंजन दास यांनी श्रीअरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. पुढे घोष यांची निर्दोष सुटका झाली. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या 'सागर संगीत' या बंगाली काव्याचा अरविंद घोष यांनी Songs of the Sea या काव्यामध्ये अनुवाद केला होता.[१]
- ^ Perspectives of Savitri - Part I by R.Y. Deshpande