संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिबेटी बौद्ध मठाबाहेर काही भिक्खू, राटो द्रात्सांग, भारत, जानेवारी २०१५

संघ (बौद्ध संघ किंवा भिक्खू संघ) हा भिक्खू-भिक्खूणींचा संघटन समूह असतो. गौतम बुद्धांनी आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्या अनुयायांना संघटिन करून बौद्ध संघ स्थापन केला. जे पुरूष अनुयायी या संघात प्रवेश करत त्यांना ‘भिक्खू’ तर स्त्री अनुयायांना ‘भिक्खूणी’ असे म्हणत. त्यांना आचरणाचे कडक नियम पाळवे लागतात. बौद्ध संघात सर्व जातींच्या लोकांना व स्त्रियांनाही प्रवेश आहे.