भीम आर्मी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भीम आर्मी किंवा आंबेडकर आर्मी ही भारतातील एक सामाजिक संघटना आहे. २३ जुलै २०१५ रोजी चंद्रशेखर आझाद (रावण) यांनी या संघटनेची स्थापना केली व ते या संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेत अनुसूचित जातींच्या तरुणांचा सहभाग असून, ही संघटना उत्तरेकडील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे.[१] अनुसूचित जातीच्या लोकांवर (दलितांवर) झालेल्या अन्यायाच्या विरूद्ध भीम आर्मी कार्य करते. चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली.[२]

हनुमान दलित असल्याने[संपादन]

योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हा दलित असल्याचे विधान केल्यानंतर चंद्रशेखर यांनी देशातील दलित बांधवांनी देशातील हनुमान मंदिरांचा ताबा घ्यावा आणि आपल्या समाजाचे बांधव पुजारी म्हणून नियुक्त करावेत असे आवाहन केले होते.[३]

संदर्भ[संपादन]