श्यामाप्रसाद मुखर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्यामाप्रसाद मुखर्जी (बंगाली : শ্যামাপ্রসাদ মুখোপাধ্যায়) (जुलै ६, इ.स. १९०१ - जून २३, इ.स. १९५३) हे बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले.