Jump to content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) (इंग्रजी: Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute / BARTI) ही पुण्यातली एक शैक्षणिक संस्था आहे.[][] डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठाची स्थापना दि. २९ डिसेंबर १९७८ रोजी मुंबई येथे करण्यात आली आणि नंतर याचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था असे करण्यात आले. ही संस्था मुंबई येथून सन १९७८ मध्ये पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आली. संस्थेस दि. १७ ऑक्टोबर २००८ रोजी महाराष्ट्र शासनाकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा प्रदान करण्यात आला, संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण, लोक प्रतिनिधी यांचे प्रशिक्षण, योजनांचे सर्वेक्षण आणि मूल्यमापन, संशोधन, विविध स्पर्धा परीक्षाचे प्रशिक्षण, हॉर्टीकल्चर प्रशिक्षण इत्यादी होते.

या शिक्षणसंस्थेतर्फे इ.स. २०१३ पासून दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य थोर समाजसुधारकांशी निगडित असलेल्या बाबींवर संशोधन करू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या ४०० विद्यार्थ्यांना, एम-फिल/पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे या नॅशनल रिसर्च फे‍लोशिप्स आहेत.

२०१६ सालापासून संत गाडगेबाबा व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावेही फेलोशिप दिल्या जाणार आहेत.

मानधन

[संपादन]

या फेलोशिपसाठी बार्टीतर्फे वेळोवेळी जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येतात. सर्व उमेदवारांची चाचणीद्वारे निवड केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या दोन वर्षांसाठी प्रती महिना २५ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यापुढील तीन वर्षांसाठी २८ हजार रुपये मानधन दिले जाते. त्याबरोबर अन्य भत्तेही दिले जातात. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शक मिळत नसल्याने संशोधनाच्या क्षेत्रात ते मागे पडतात. त्यामुळे बार्टी हा फेलोशिप कार्यक्रम राबविते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]