तारा (बौद्ध धर्म)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिहार मध्ये दहाव्या शतकातील आर्य ताराची मूर्ती
हरी तारा (तिबेट, १९९३)

महायान तिबेटी बौद्ध धर्माच्या संदर्भात तारा (तिबेटी: སྒྲོལ་མ, Dölma) किंवा आर्य तारा एक स्त्री बोधिसत्त्व आहे. वज्रयान बौद्ध धर्मात ही स्त्री बुद्धाच्या रूपात आहे. ती "मुक्तीची जननी" म्हणून मान्य आहे तसेच कार्य व उपलब्धीच्या क्षेत्रात यशाची द्योतक आहे. हिला जपानमध्ये 'तारा बोसत्सु' (多羅菩薩) व चिनी बौद्ध धर्मात डुओलुओ पुसा म्हटले जाते.