स्वराज पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्वराज पार्टी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

स्वराज्य पक्षाची स्थापना

 • सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या.
 • असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
 • काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.

स्वराज्य पक्ष आणि त्यांचा कार्यक्रम[संपादन]

 1. गांधीजींच्या अटकेमुळे राजकीय पोकळी निर्माण झाली.
 2. ती भरून काढण्यासाठी चित्ता रंजन दास, बिपिनंचद्र पाल, मोतीलाल नेहरू, लाला लजपतराय यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन 1 जानेवारी 1923 रोजी स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
 3. 1920 च्या कोलकत्ता अधिवेशात कॉग्रेसमध्ये दोन गट पडले.
 4. फेरवादी गट म्हणजे कायदे मंडळात जाऊन ब्रिटिशाना मदत करणे चित्ता रंजन दास, मोतीलाल नेहरु, विठ्ठलभाई पटेल या गटाचे प्रमुख होते. नाफेरवादी गट म्हणजे कायदेमंडळावर बहिष्कार टाकणे.डॉ अन्सारी राजगोपालाचारी एस कस्तुरी रंगा, अयंग्गार इ. या गटाचे प्रमुख होते.

स्वराज्य पक्षाचा कार्यक्रम[संपादन]

 1. 1923 च्या कायदेमंडळाच्या निवडणूकीत भाग घेऊन 145 पैकी 45 जागा प्राप्त केल्या व 24 स्वतंत्र सभासद मिळवले
 2. भारतीय राज्यघटनेचा ठराव मंजूर केला.
 3. हिंदुस्थानला जबाबदार राज्यपध्दत स्थापन करण्यासाठी गोलमेज परिषद भरवावी ही मागणी इंग्लंड सरकारने फेटाळली
 4. 1919 व्या कायद्यातील दोषांचे निरीक्षण करण्यासाठी मुडिसन समिती नेमण्यास भाग पडले.
 5. 1924-27 या काळात वार्षिक अंदाजपत्रक मंजूर होऊ दिले नाही. 1925 मध्ये चित्ता रंजन दास यांचा मृत्यू झाल्याने पक्षाला हादरा बसला त्यामुळे हळूहळू पक्षाचा अस्त झाला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.