राहुल सांकृत्यायन
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
राहुल सांकृत्यायन | |
---|---|
राहुल सांकृत्यायन | |
जन्म नाव | केदारनाथ गोवर्धन पांडे |
जन्म |
९ एप्रिल, इ.स. १८९३ पंधहा, आजमगड,उत्तरप्रदेश |
मृत्यू |
१४ एप्रिल, इ.स. १९६३ दार्जिलिंग, पश्चिम बंगाल |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | लेखक, निबंधकार, विद्वान, समाजशास्त्र, भारतीय राष्ट्रवादी, इतिहास, भारतीय विद्या, तत्त्वज्ञान, बौद्ध धर्म, तिबेटशास्त्र, शब्दकोशलेखन, व्याकरण, मजकूर संपादन, लोकसाहित्य, विज्ञान, नाटक, राजकारण, विविध विषयांचे व्यासंगी विद्वान, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेले भाषापंडित |
भाषा | हिंदी, पाली, संस्कृत, अर्धमागधी, इंग्लिश, अरबी, फारसी, फ्रेंच, तमिळ, कन्नड, चिनी, जपानी, तिबेटी, रशियन इ. |
साहित्य प्रकार | प्रवासवर्णन, कथा, आत्मकथा |
कार्यकाळ | आधुनिक |
प्रसिद्ध साहित्यकृती | व्होल्गा से गंगा, मेरी जीवन यात्रा |
प्रभावित | कुमार नेपाल, हजारीप्रसाद द्विवेदी. |
वडील | गोवर्धन |
आई | कुलवन्ती |
पत्नी | ॲलेना |
अपत्ये | इगोर राहुलोविच |
पुरस्कार | हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सन्मानित डॉक्टरेट, पद्मभूषण, हिंदी यात्रासहित्याचे पितामह |
महापंडित राहुल सांकृत्यायन (मूळ नाव केदानाथ पांडे, जन्म : पंदहा, उत्तर प्रदेश, ९ एप्रिल १८९३; - दार्जिलिंग, १४ एप्रिल १९६३) हे हिंदी साहित्यातील नावाजलेले लेखक, पंडित व तत्त्वज्ञानी होते.
जीवन
[संपादन]जागतिक कीर्तीचे भारतीय महापंडित, लेखक तसेच बौद्ध धर्माच्या अभ्यासामुळे ‘त्रिपिटकाचार्य’ या गौरवाने सन्मानित झालेले राहुल सांकृत्यायन यांचा जन्म ९ एप्रिल इ.स. १८९३ रोजी झाला. लहानपणापासून विरक्त वृत्तीचे असल्याने साधू बनण्यासाठी ते काशी येथे गेले. तेथे त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. या काळात ते आर्य समाजाकडे वळले. निःस्वार्थी वृत्तीच्या हिंदू मिशनऱ्यांची संघटना उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. १९१७ मध्ये रशियात झालेल्या क्रांतीने ते प्रभावित झाले.
ग्रंथसंपदा
[संपादन]‘साम्यवाद ही क्यों’, ‘मानवसमाज’, ‘राजनीती’ हे ग्रंथ लिहिले. श्रीलंकेत १९३० च्या सुमारास बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि मूळचे केदारनाथ पांडे दीक्षा घेतल्यावर राहुल सांकृत्यायन झाले. यानंतर बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी नेपाळ, तिबेट, म्यानमार, जपान, कोरिया अगदी युरोपही पालथा घातला. रशियात काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले. तेथे एलेना या स्त्रीशी त्यांनी विवाह केला. पाली, संस्कृत, अर्धमागधी या प्राचीन भाषांसह इंग्रजी, अरबी, फारशी, फ्रेंच, तमिळ, कन्नड, चिनी, जपानी, तिबेटी, रशियन इ. भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. साम्यवाद व बौद्ध तत्त्वज्ञान या दोघांची सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धम्मपट, विजयपिटक या बौद्ध ग्रंथांचा हिंदी अनुवाद, तुरुंगात असताना ‘व्होल्गा से गंगा’ हा कथासंग्रह, याशिवाय ‘मेरी साधक यात्रा’, ‘तिब्बत मे सवा वर्ष’, 'मेरी लडाख यात्रा', ‘मेरी युरोप यात्रा’ ही प्रवासवर्णने, ‘सतमी के बच्चे’, ‘बहुरंगी धपुरी’ या कथा तर ‘जीने के लिए’, ‘जय योधेय’ या कादंबऱ्या ही त्यांची ग्रंथसंपदा.[१] याशिवाय धर्म, तत्त्वज्ञान, राजनीती, इतिहास, पुराण, प्राच्यविद्या, व्याकरण, विज्ञान, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, नाटक आदी विषयांवर त्यांनी दीडशेच्यावर ग्रंथ लिहिले.
विस्मृति_के_गर्भ_में ही महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी १९२३ साली लिहिलेली ही कादंबरी. प्रो.विद्याव्रत,धनदास,धीरेन्द्र आणि चाङ् यांच्यासोबत मितनी हर्पी (Mitanni) या साम्राज्याची केलेली यात्रा...इजिप्त साम्राज्यातील अनेक नावांची,शहरांची ओळख करून देणारी, इतिहासातील एका संस्कृतीचा भाग प्रकाशात आणणारी ही वेगळ्या धाटणीची कादंबरी आहे. मितनी हर्पी साम्राज्याच्या राजकुमारीचा तिच्या बलाढ्य सेनापतीसोबतचा अस्तित्वाचा लढा...थेबिसच्या राजकुमाराची कबर...आणि कबरीत लपवलेले अनमोल रत्न,जवाहिरे..चित्रलिपीच्या संशोधकाने उत्सुकतेपोटी व जगासमोर प्राचीन इतिहास शोधण्यासाठी केलेली धडपड, त्यातील गुंता...आणि विजयी 'उकल' यांचे दर्शन घडविणारी कादंबरी आहे.
अभ्यासविशेष
[संपादन]वैदिक हिंदू धर्म, आर्यसमाज, साम्यवाद, बौद्ध धर्म आणि शेवटी मानवता हाच धर्म असा सांकृत्यायन यांचा व्यापक वैचारिक प्रवास आहे.
सन्मान
[संपादन]हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सन्मानित डॉक्टरेट, पद्मभूषण आदी मानसन्मान राहुल सांकृत्यायन यांना मिळाले.
निधन
[संपादन]१४ एप्रिल १९६३ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.
राहुल सांकृत्यायन यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]राहुल सांकृत्यायन यांच्या पुस्तकांचे जगातील सर्व भाषांत अनुवाद झाले आहेत, त्यांपैकी मराठीत अनुवादित झालेली काही पुस्तके :-
- अकबर
- दर्शन दिग्दर्शन
- दिवोदास
- भागो नही दुनिया को बदलो(हिंदी)
- माओचे चरित्र
- व्होल्गा ते गंगा
- सिंह सेनापति
बाह्य दुवे
[संपादन]- महापंडित राहुल सांकृत्यायन पुरस्कार Archived 2010-05-30 at the Wayback Machine.
- ^ Sharma, R.S. (2009). Rethinking India's Past. Oxford University Press. ISBN 978-0-19-569787-2.