झेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झेन हा बौद्ध धर्मातील महायान पंथाचा एक उपपंथ आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकात चीनमध्ये त्याचा उदय झाला. संस्कृत ‘ध्यान’, पाली ‘ज्झान’, जपानी ‘झेन्ना’ या उच्चारांचे ‘झेन’शी साम्य आहे. समाधी, मनन किंवा चिंतन हा झेनचा मूलभूत अर्थ असून विश्व व मानवी जीवन यांचे वास्तव स्वरूप जाणण्यासाठी विचार केंद्रित करण्याची ती एक पद्धत आहे.

बुद्धत्वाच्या प्राप्तीवर झेनचा भर आहे. सूत्रे आणि सिद्धांतांच्या केवळ ज्ञानास झेन महत्त्व देत नाही तर अनुभवी गुरूच्या मार्गदर्शनाखाली थेट आकलनास हा पंथ महत्त्व देतो. झेनमताचा उपदेश महायान पंथातील योगाचार आणि तथागत गर्भसूत्र या स्रोतांवर आधारलेला आहे.