पाचवी बौद्ध संगीती
पाचवी धम्म संगीती किंवा पाचवी बौद्ध संगीती इ.स. ५७ मध्ये सम्राट श्रीदुष्क याच्या कारकीर्दित गांधार (काश्मीर) मध्ये भरवण्यात आली होती. ही बौद्ध परिषद तीन वर्षे चालली, या संगीतीत भिक्खु संघाने धम्म तत्त्वज्ञान लिखित स्वरूपात निर्मीले. प्रथमतः बुद्ध चरित्र लिहिण्यात आले. कारण या कालखंडात बौद्ध धम्माचा अत्यंत व्यापक प्रमाणात विस्तार झाला होता. त्यामुळे सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. म्हणून बुद्ध चरित्र लिहिण्याचा परिस्थिती सापेक्ष निर्णय घेण्यात आला. बौद्ध भिक्खू अश्वघोष, यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध चरित्र लिहिण्यात आले. नंतर अनेक देशी व विदेशी भाषांमध्ये हे बुद्ध चरित्र भाषांतरीतही करण्यात आले.
थेरवाद संगीती
[संपादन]थेरवाद पाचवी बौद्ध संगीती मंडाले म्यानमार येथे पार पडली. या बौद्ध संगीतीचा मुख्य उद्देश बौद्ध धम्म सिद्धांतांचे पुनश्च वाचन करणे हा होता. तसेच वगळलेले, बदललेले, सर्व धम्म नियमांचे पुनः परीक्षण करणे हा होता.
हे सुद्धा पहा
[संपादन]- बौद्ध संगीती
- पहिली बौद्ध संगीती
- दुसरी बौद्ध संगीती
- तिसरी बौद्ध संगीती
- चौथी बौद्ध संगीती
- सहावी बौद्ध संगीती