बिधन चंद्र रॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिधन चंद्र रॉय
बिधन चंद्र रॉय

कार्यकाळ
२३ जानेवारी १९४८ – १ जुलै १९६२
मागील प्रफुल्लचंद्र घोष
पुढील राष्ट्रपती राजवट

जन्म १ जुलै, १८८२ (1882-07-01)
पाटणा, बिहार, ब्रिटीश भारत
मृत्यू १ जुलै, १९६२ (वय ८०)
कोलकाता, पश्चिम बंगाल
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी अविवाहित
व्यवसाय वैद्यकीय चिकित्सक
स्वातंत्र्यसेनानी
धर्म हिंदू

बिधन चंद्र रॉय (बंगाली: বিধান চন্দ্র রায়, १ जुलै १८८२ - १ जुलै १९६२) हे एक भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते. पेशाने एक चिकित्सक असणारे रॉय एक आघाडीचे स्वातंत्र्यसेनानीमहात्मा गांधींचे निकटवर्ती सहकारी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी गांधींच्या सांगण्यावरून राजकारणामध्ये प्रवेश केला व १९४८ साली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ह्या पदावर ते पुढील १४ वर्षे होते. १९६१ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. १ जुलै १९६२ रोजी त्यांच्या जन्मदिवशी रॉय ह्यांचे निधन झाले.