सत्याग्रह
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अन्यायाविरुद्ध शांततेने आणि दृढ निश्चय याद्वारे प्रतिकार करण्याचा एक अभिनव अहिंसक मार्ग म्हणजे सत्याग्रह होय सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणे असाही होतो प्राचीन भारतीय वागण्यात विशेषतः पौराणिक कथा आख्यायिका यातून सत्याग्रहाची काही उदाहरणे आढळतात सत्यनिष्ठा सत्यव्रत सत्यसंघ या शब्दांचा उल्लेख आढळतो मात्र सत्याग्रह शब्दाचा अर्थ याहून अधिक व्यापक असा आहे सत्याग्रह यामध्ये प्रतिकारासाठी संयम व सहनशीलतेची अत्यंत आवश्यकता असते अन्याय करणाऱ्या व्यक्तीला सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व त्या व्यक्तीचे मतपरिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट असते सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य याचा वापर करता कामा नये सत्याग्रहाचा हा मार्ग सामान्य माणसालाही अनुसरता येतो 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्र महात्मा गांधींच्या हाती आली महात्मा गांधींनी नेतृत्व स्वीकारल्यानंतर भारतामध्ये प्रथमच सत्याग्रहाचा अभिनव प्रयोग करण्यात आला जुलूम व अन्याय यांचा अहिंसक मार्गाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न या तंत्राच्या माध्यमातून केला गेला सत्याग्रह तत्त्वांचा विचार करता त्यामध्ये सत्याग्रह करणाऱ्याने अन्याय सहन न करता त्याचा अहिंसक मार्गाने प्रतिकार करणे आवश्यक असते सत्याग्रहा मध्ये विरोधकांच्या बाबतीत सौजन्य आणि त्यांचा दृष्टीकोन समजून घेणे ही खरी सुरुवात असते त्याचप्रमाणे विरोधकांमधील चांगले गुण शोधून त्यांना एक प्रकारे आळवणे किंवा चुकीच्या मार्गाने जाण्यापासून त्यांना रोखणे असा असतो आत्मक्लेशाच्या साह्याने विरोधकाचे मन परिवर्तन घडून आणणे हेही यामध्ये अपेक्षित असते प्रतिपक्षाच्या क्रोधाचा धैर्याने सामना करण्याची क्षमता ही सत्याग्रही मध्ये असते अहिंसे मुळे प्रति पक्षातील लोकांचे हृदय परिवर्तन होते प्रतिपक्षावर दडपण आणण्यापेक्षा त्यांचे मतपरिवर्तन करणे हाच सत्याग्रहाचा मुख्य उद्देश असतो महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळामध्ये भारतातील सर्व जनतेला सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी प्रेरित केले या आंदोलनाचे स्वतः त्यांनी नेतृत्व केले