मानववंशशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मानवशास्त्र ही एक अभ्यासशाखा आहे. उत्ख्नननात सापडणा-या अस्थी किंवा अवशेषांचा अभ्यास करून मानव वंश कसा कसा विकसित होत गेला याचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो याला "मानवशास्त्र" म्हणतात.[१]

मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला जातो. मानवाचे पूर्वज, त्याची स्वभाववैशिष्टय़े, मानवी वागणूक, मानवी समुदायातील भिन्नता व वेगळेपण, मानवी उत्क्रांतीचा समाजबांधणी व संस्कृतीवर परिणाम यांसारख्या विषयांचा अभ्यास मानववंशशास्त्रात केला जातो. हा अभ्यास करतांना मानवाचा उगम, भौतिक वैशिष्टय़े, रीती, भाषा , परंपरा, वस्तुसंचय तसेच सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक श्रद्धा व पद्धती आदी विषयांचा समावेश होतो. समाजशास्त्र, विकास, अर्थशास्त्र, गुन्हेविषयक मानसशास्त्र व कायदेव्यवस्था, स्त्री-पुरुष समानता या सर्वात मानववंशशास्त्राचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो

सामाजिक- सांस्कृतिक मानववंशशास्त्र[संपादन]

मानवाच्या वागणुकीचा, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला जातो. यामध्ये समूहाच्या मैत्रीसंबंधांचा, बांधीलकीचा, जमातीचा, समुदायाच्या एकत्रित येण्याच्या वा समाज म्हणून एकत्र होण्याचा अभ्यास केला जातो.

जीवशास्त्रीय मानववंशशास्त्र[संपादन]

शरीरातील बदल व शारीरिक गुणधर्म यांचे निरीक्षण व मोजमाप करून अभ्यास केला जातो. यावरून जीवशास्त्रीय उत्क्रांतीवरच्या टप्प्याचा अभ्यास केला जातो.

पुरातत्त्वीय मानववंशशास्त्र[संपादन]

शिलालेख, त्या काळातील भांडी, हाडे आदीवरून त्या काळातील संस्कृतीचा अभ्यास यात केला जातो.

भाषिक मानववंशशास्त्र[संपादन]

भाषेच्या उगमाचा व विकासाचा अभ्यास केला जातो. यामध्ये लेखी व बोलीभाषांचा समावेश होतो.

उपयोजित मानववंशशास्त्र[संपादन]

यामध्ये मानववंशशास्त्रीय अभ्यासातून पुढे आलेल्या माहितीचा उपयोग सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी केला जातो.



संदर्भ[संपादन]

  1. ^ "anthropology | Definition, Meaning, Branches, History, & Facts | Britannica". www.britannica.com (इंग्रजी भाषेत). 2022-04-14 रोजी पाहिले.