विजयादशमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
विजयादशमी जयपूर रावणदहन

विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. [१] आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.[२]

 • विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.
 • याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात.

महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन व शमीपूजन आणि शस्त्रपूजा करतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती. मुले स्लेट पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते.

प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता.[३] पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत.[४] ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.

पौराणिक आख्यायिका[संपादन]

रामलीला सादरीकरण
 • विजयादशमीला रावणाचा जन्म झाला आणि वधही.पण याविषयी काहे मतभेद आहेत.[५]
 • श्रीरामाने विजया दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे.[६]
 • या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले

भारतातील विविध प्रांतांतील दसरा[संपादन]

म्हैसूर दसरा मिरवणूक

उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालूं असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात.[२][७] कुलू शहरातला दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.[८]

सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.[९]

छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्त्व दिले जाते.[८]

उत्तर भारतातील दसरा रावणदहन एक दृश्य

महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात.तसेच बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात.

घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे,वाहने यांना झेंटूच्या फुलांच्या माळा घालतात.

पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करतात. लोक परस्परांना मिठाई भेट देतात.[८]

बंगालमध्ये दुर्गापूजा एक दृश्य

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.[८]

संस्थानी दसरे[संपादन]

महाराष्ट राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान हे अंबाबाई देवतेच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथील दसरा सोहळाही वैशिष्ट्यपूर्ण आहे.येथील ऐतिहासिक दसरा चौकात हा सोहळा संपन्न होतो. शाहू महाराजांचे वारस या कार्यक्रमात सहभागी होतात. संध्याकाळी भवानी मंडपातून मिरवणुकीला प्रारंभ होतो. विविध वाद्ये, तोफांचे आवाज, वाद्य पथके, सनई चौघडे, हत्ती घोडे यांची शोभायात्रा निघते. राज परिवार आणि सर्व नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेतात. शमीचे पूजन, मंत्रोच्चार करतात आणि शाहू महाराजांच्या पुतळ्याची पूजा करतात.[१०]

शमीचे झाड[संपादन]

पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले. विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते.[११]

आपट्याची पाने[संपादन]

या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात.[१२] ही पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत.

विजयादशमीला आपट्याची पाने परस्परांना दिली जातात. याला सोने लुटणे असेही म्हणतात.[१३][१४]

चित्रदालन[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]

 • "दसरा - विजयादशमी".

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ Achari, Prafull (2019-09-29). नवरात्री भाग १ घटस्थापना: Navratri part 1 Ghatsthapna. prafull achari.
 2. a b PANDEY, PRITHVI NATH (2009-01-01). ACHCHHE-ACHCHHE NIBANDH (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9788173156595.
 3. ^ Pathak, Dr Pramod (2014-01-26). Mahamanav Chhatrapati Shivaji Maharaj / Nachiket Prakashan: महामानव छत्रपती शिवाजी महाराज. Nachiket Prakashan.
 4. ^ भारतीय संस्कृती कोश खंड चौथा. भारतीय संस्कृतिकोश मंडळ प्रकाशन. २००१.
 5. ^ Nath, Rakesh (2013-08-03). Kya Ram Ka Ramrajya Apnaya Ja Sakta Hai?: Hindi Indology (हिंदी भाषेत). Vishv Books Private Limited. ISBN 9789350650219.
 6. ^ Upādhyāya, S. P. (1978). Bhāratīya parva aura tyohāra.-- (हिंदी भाषेत). Sāhitya Pracāraka.
 7. ^ (Ācārya), Śrīrāma Śarmā (1972). Parva aura tyauhāroṃ kī sṃ̄skr̥tika pr̥shṭhabbūmi (हिंदी भाषेत). Yuga Nirmāṇa Yojanā.
 8. a b c d Achari, Prafull (2019-09-29). नवरात्री भाग ११ संपूर्णम: Navratri part 11 Sampurnam. prafull achari.
 9. ^ Lal, R. B. (2003). Gujarat (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 9788179911044.
 10. ^ लिपारे, दयानंद (४. १०. २०१९). "दसरा विशेष : सोन्याहून अनमोल कोल्हापूरचा शाही दसरा". ५. १०. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 11. ^ Śitoḷe), Suśilādevī Ghorapaḍe (Rajmata of (1998). Rājā Śitoḷe āṇi Mahārājā Mahādajī Śinde yāñcī smaraṇagāthā. Rājamātā Suśilādevī Ghorapaḍe (Soṇḍūra).
 12. ^ Sankalit (2016-12-01). Dr. Hedgewar (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 9789384414962.
 13. ^ Dubhashi, Vamana Mangesa (1979). Aryancya sananca pracina va arvacina itihasa. Prajnapathasalamandala.
 14. ^ Cendavaṇakara, Sadānanda (1966). Bhāratīya saṇa āṇi utsava. Nirṇaya Sāgara Buka Prakāśana.