समाजशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहाससंख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो.

समाजशास्त्राला इंग्रजीत "Sociology" म्हणतात,

ऑगस्ट कॉम्ट हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. इ.स. १८३९मध्ये त्याने सामाजिक भाषणात आणि नंतर Positive philosophy या ग्रंथात "समाजशात्र" या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला. हो

अनुक्रमणिका

उपशाखा[संपादन]

समाजशास्त्रात अनेक उपशाखा आहेत समाजशास्त्रात विविध समस्या घेऊन अभ्यास केला जातो. समाजशास्त्रत अनेक शास्त्रज्ञांनी विविध सिद्धांत मांडला आहे यामध्ये त्यांनी आपले विचार मांडले आहे तसेच त्यांनी ग्रामीण व शहरी भागाचा अभ्यास समाजशास्त्रत केला आहे.सामाजिक चळवळी व त्यांचा समस्या समाजशास्त्रत मांडले आहे.

उपयोजित समाजशास्त्र[संपादन]

लिंगभावाचे समाजशास्त्र[संपादन]

सामूहिक वर्तनशास्त्र[संपादन]

तुलनात्मक समाजशास्त्र[संपादन]

लोकसंख्याशास्त्र[संपादन]

मानवी परिसंस्थाशास्त्र[संपादन]

वैद्यकीय समाजशास्त्र[संपादन]

औद्योगिक समाजशास्त्र[संपादन]

लष्करी समाजशास्त्र[संपादन]

  • सैन्याची विचारसरणी
  • सैन्याची अंतर्गत एकी
  • सैनिकी वृत्ती आणि सैनिकी सावधानता
  • सैन्यामधील स्त्रियांचे स्थान
  • सैन्याच्या औद्योगिक व शैक्षणिक परिसरांतील जीवन
  • सेना - संस्था आणि संरचना
  • सैन्याची सततची युद्धाची तयारी

राजकीय समाजशास्त्र[संपादन]

धार्मिक समाजशास्त्र[संपादन]

शहरी समाजशास्त्र[संपादन]

ग्रामीण समाजशास्त्र[संपादन]

भारतीय ग्रामीण समाजशास्त्राच्या अभ्यासात, भारतातील ग्रामीण संरचनांचा, जातिव्यवस्थेचा, गावाच्या आर्थिक आणि राजकिय संरचनांचा अभ्यास केला जातो.

मराठी ग्रामीण समाजशास्त्राच्या सुरुवातीच्या अभ्यासाठी वरदा प्रकाशनाने पुनःप्रकाशित केलेले त्र्यंबक नारायण अत्रे यांचे गावगाडा हे पुस्तक उपयुक्त आहे.

शेतकरी समाजशास्त्र[संपादन]

सामाजिक मानसशास्त्र[संपादन]

सैद्धान्तिक समाजशास्त्र[संपादन]

शैक्षणिक समाजशास्त्र[संपादन]

न्याय समाजशास्त्र[संपादन]

आंतरजालीय समाजशास्त्र[संपादन]

माध्यमाचे समाजशास्त्र[संपादन]

वर्गांचे आणि जातींचे समाजशास्त्र[संपादन]

विज्ञानाचे समाजशास्त्र[संपादन]

पर्यावरणाचे समाजशास्त्र[संपादन]

ज्ञानाचे समाजशास्त्र[संपादन]

कार्ल मेनहिंम ज्यांनी ज्ञानाचे समाजशास्त्र ह्या शाखेला जन्म दिला ते म्हणतात, ज्ञानशाखा ज्ञानाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी शाखा आहे.[१] म्हणजेच व्यक्तींच्या सामाजिक अस्तित्वाच्या माध्यमातुन सामाजिक विश्व आणि ज्ञान यांमधील नाते ठरते. याचाच अर्थ असा की, विशिष्ट सामाजिक गटाच्या कल्पना त्या गटाच्या सामाजिक संरचनेतील स्थानाशी संबंधीत असतात. कार्ल मार्क्सने सामाजिक वर्गाच्या त्याच्या विश्लेषणामध्ये त्याने कल्पनांचे नाते सामाजिक वर्गाशी जोडले आहे, ज्याचाच अर्थ असाही होतो की, ज्ञानाच्या विचारविश्वाच्या समाजशास्त्राची मांडणी मेनहिंमने त्याच्या आधिच्या अनेक समाजशास्त्राच्या अभ्यासकांच्या कार्याचा आधार घेऊन केली आहे. मर्टनने(१९५७) केलेल्या व्याख्येनुसार, ज्ञानाचे समाजशास्त्र हे कल्पनांचा किंवा वैचारिक व्यवहारांचा पध्दतशिर अभ्यास करते.[२]

भारतीय समाजशास्त्रज्ञ[संपादन]

भारतीय समाजशास्त्र[संपादन]

सामाजिक संघटना[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. Goodman, D. J., & Ritzer, G. (2004). Classical sociological theory.
  2. Merton, R. K. (1973). The sociology of science: Theoretical and empirical investigations. University of Chicago press.