भीमराव यशवंत आंबेडकर
Appearance
भीमराव आंबेडकर किंवा भीमराव आंबेडकर (राजकारणी) याच्याशी गल्लत करू नका.
भीमराव यशवंत आंबेडकर | |
---|---|
भीमराव आंबेडकर यांचे त्यांच्या कार्यालयातील छायाचित्र | |
जन्म |
१४ डिसेंबर, १९५८ |
निवासस्थान | राजगृह |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा |
• राष्ट्रीय कार्याध्यक्ष - भारतीय बौद्ध महासभा, |
मूळ गाव | अंबाडवे, रत्नागिरी |
धर्म | बौद्ध धर्म |
वडील | यशवंत आंबेडकर |
आई | मीरा आंबेडकर |
नातेवाईक | आंबेडकर कुटुंब पहा |
भीमराव यशवंत आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. ते एक अभियंता आहेत. त्यांनी अनेक सामाजिक धार्मिक कामे केली आहेत.. भीमराव आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व यशवंत आंबेडकर यांचे द्वितीय पुत्र आहेत. ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांचे भाऊ आहेत. भीमराव साहेब आंबेडकर ह्यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर चालत समाजाचे नेतृत्व स्वीकारले आहे. भीमराव आंबेडकर हे बाबासाहेबांचे वंशज असून बाबासाहेब यांचे नातू आहेत. त्यांनी समता सैनिक दलाचे नेतृत्त्व स्वीकारून या देशात समाजाच्या संरक्षणासाठी समता सैनिक दलाच्या माध्यमातून समाजाला एक नवीन दिशा देण्याचे काम केले आहे. [१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- आंबेडकर कुटुंब