दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?दिल्ली
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र • भारत
—  मेट्रो  —
लोटस टेंपल
लोटस टेंपल

२८° ४२′ ००″ N, ७७° १२′ ००″ E

गुणक: 28°37′N 77°14′E / 28.61°N 77.23°E / 28.61; 77.23
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१,४८३ चौ. किमी
• २३९ मी
जिल्हे
लोकसंख्या
घनता
मेट्रो
१,३३,००,००० (२ रा) (२००७)
• ७,७५८/किमी
• २,१५,००,००० (१ ला) (२००७)
भाषा हिंदी, पंजाबी, उर्दू
मुख्यमंत्री केंद्र शासन
राज्यपाल तेजेंद्र खन्ना
स्थापित १ नोव्हेंबर १९५८
विधानसभा (जागा) Unicameral (70)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

त्रुटि: "110 xxx" अयोग्य अंक आहे
• +११
• INDEL
• DL-xx
संकेतस्थळ: दिल्ली संकेतस्थळ

गुणक: 28°37′N 77°14′E / 28.61°N 77.23°E / 28.61; 77.23 दिल्ली(साचा:Lang-hi, पंजाबी: ਦਿੱਲੀ, उर्दू: دِلّی) or Dehli (साचा:Lang-hi, पंजाबी: ਦੇਹਲੀ, उर्दू: دهلی) हे उत्तर भारतातील एक महानगर आहे. राजकीयदृष्ट्या दिल्ली शहर एक केंद्रशासित प्रदेश आहे. या शहराचा कारभार केंद्र सरकार, दिल्ली राज्य शासन आणि तीन महानगर पालिका पाहतात. जी नवी दिल्ली भारतीय प्रजासत्ताकाची राजधानी आहे, ती दिल्ली या महानगरातील एक शहरी भाग आहे. दिल्लीची लोकसंख्या सुमारे दीड कोटी (इ.स. २००५चा अंदाज) असून ते जगातील सातवे सगळ्यांत जास्त लोकसंख्या असलेले महानगर आहे.[१][२][३][४] राजधानीचे शहर असल्याने येथे देशातील विविध भागातून नागरिक स्थायिक झाले आहेत, त्यामुळे दिल्ली हे एक बहुसांस्कृतिक महानगर बनले आहे. झपाट्याने झालेले शहरीकरण व वेगाने झालेली प्रगती त्यामुळे दिल्लीचा आर्थिक क्षेत्रात विकास झाला आहे. दिल्लीच्या नागरिकांची सरासरी मिळकत ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा बरीच जास्त आहे.[५]

भूगोल[संपादन]

दिल्ली व परिसराला मिळून अनौपचारिकपणे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असे म्हणतात. त्यात दिल्लीव्यतिरिक्त शेजारच्या हरियाणा राज्यातील फरिदाबाद व गुडगाव आणि उत्तर प्रदेशातील नॉयडा व गाझियाबाद या शहरांचा समावेश होतो. नैर्ऋत्येकडील अरवली पर्वतरांगा आणि पूर्वेकडील यमुना नदी यांच्यामध्ये वसलेली दिल्ली इतिहास काळापासून महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.

इतिहास[संपादन]

विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे वायव्य हिंदुस्थानातून गंगेच्या खोर्‍यात जाणार्‍या जुन्या व्यापारमार्गांवर दिल्लीने दबदबा राखला. हे शहर पुरातन भारतातील अनेक साम्राज्यांची राजधानी होते. दिल्लीत स्थलांतरित होणार्‍यांची संख्या वाढत गेल्याने ती संस्कृती आणि बुद्धिजनांचे माहेरघर बनली.

परंतु वाढत्या लोकसंख्येमुळेच आज दिल्ली ही प्रदूषण, वाहतुकीची कोंडी, वीजटंचाई आणि पाणी टंचाई अशा अनेक समस्यांना तोंड देत आहे.

हवामान, भूगोल आणि लोकसंख्या[संपादन]

दिल्ली-एनसीआर[संपादन]

भौगोलिक स्थान[संपादन]

जल संपत्ती[संपादन]

हवामान[संपादन]

वायू प्रदूषण[संपादन]

लोकसंख्या[संपादन]

दिल्लीतील जिल्हे[संपादन]

 • नवी दिल्ली
 • मध्यवर्ती दिल्ली
 • उत्तर दिल्ली
 • ईशान्य दिल्ली
 • पूर्व दिल्ली
 • दक्षिण दिल्ली
 • नैर्ऋत्य दिल्ली
 • पश्चिम दिल्ली
 • वायव्य दिल्ली

दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री[संपादन]

 • ब्रह्मप्रकाश चौधरी (काँग्रेस) : १७ मार्च १९५२ ते १२ फेब्रुवारी १९५५; दोन वर्षे ३३२ दिवस
 • गुरुमुख निहालसंग (काँग्रेस) : १२ फेब्रुवारी १९५५ ते १ नोव्हेंबर १९५६; एक वर्ष २६३ दिवस
 • १ नोव्हेंबर १९५६ ते २ डिसेंबर १९५६ : विधानसभा बरखास्त; ३७ वर्षे १ दिवस
 • मदनलाल खुराणा (भारतीय जनता पक्ष) : २ डिसेंबर १९९३ ते २६ फेब्रुवारी १९९६; दोन वर्षे ८६ दिवस
 • साहिबसिंग वर्मा (भारतीय जनता पक्ष) : २६ फेब्रुवारी १९९६ ते १२ ऑक्टोबर १९९८; दोन वर्षे २२८ दिवस
 • सुषमा स्वराज (भारतीय जनता पक्ष) : १२ ऑक्टोबर १९९८ ते ३ डिसेंबर १९९८; ५२ दिवस
 • शीला दीक्षित (काँग्रेस) : ३ डिसेंबर १९९८ ते २८ डिसेंबर २०१३; १५ वर्षे २५ दिवस
 • अरविंद केजरीवाल (आम आदमी पक्ष) : २८ डिसेंबर २०१३ ते १४ फेब्रुवारी २०१४; ४९ दिवस
 • १४ फेब्रुवारी २०१४ ते १४ फेब्रुवारी २०१५ : एक वर्ष एक दिवस
 • अरविंद केजरीवाल (आम आदमी पक्ष) : १४ फेब्रुवारी २०१५पासून....


संकेत जिल्हा प्रशासकीय केन्द्र लोकसंख्या (२००१ची गणना) क्षेत्रफळ (चौ.किमी) घनता (प्रती चौ.किमी)
DL दिल्ली दिल्ली १,३७,८२,९७६ १,४८३ ९,२९४

चित्रदालन[संपादन]

KUTUBMINAR


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ Irfan Habib. The agrarian system of Mughal India, 1556-1707. Oxford University Press, 1999. आय.एस.बी.एन. 9780195623291. "... The current Survey of India spellings are followed for place names except where they vary rather noticeably from the spellings in our sources: thus I read "Dehli" not "Delhi ..." 
 2. ^ Royal Asiatic Society. Journal of the Royal Asiatic Society of Great Britain & Ireland. Cambridge University Press, 1834. "... also Dehli or Dilli, not Delhi ..." 
 3. ^ L.T. Karamchandani. India, the beautiful. Sita Publication, 1968. "... According to available evidence the present Delhi, spelt in Hindustani as Dehli or Dilli, derived its name from King ..." 
 4. ^ The National geographical journal of India, Volume 40. National Geographical Society of India, 1994. "... The name which remained the most popular is Dilli with variation in its pronunciation as Dilli, Dehli, or Delhi ..." 
 5. ^ Dayal, Ravi (July 2002). "A Kayastha’s View". Seminar (web edition) (515). 29 January 2007 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]