Jump to content

ठाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख ठाणे शहराविषयी आहे. ठाणे जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या




या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


  ?ठाणे

मुंबई • महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
तलाव पाळी , ठाणे
Map

१९° १०′ ४८″ N, ७२° ५७′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मुंबई, मिरा - भाईंदर, कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई
जिल्हा ठाणे
तालुका/के ठाणे
लोकसंख्या १२,६१,५१७ (2001)
संसदीय मतदारसंघ ठाणे
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 400601
• +०२२
• MH-04

ठाणे (ठान्हा) शहर हे फार प्राचीन शहर असून या शहराचा उल्लेख मध्ययुगातील शिलालेखात आणि ताम्रपटात आपल्याला सापडतो, आता मात्र ठाणे औद्योगिक दृष्टीकोनातून एक विशाल शहर म्हणून उदयाला आले आहे, ठाणे शहर मुंबईसारख्या महानगराला जोडले गेले असल्याने त्या महानगराची संस्कृती आता ठाण्याने आत्मसात केली आहे. ठाणे हे ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ठाणे शहराचा कारभार ठाणे महानगरपालिका चालवते. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्थानक आहे.

खरं तर ठाणे शहराची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे.तरी देखील आता या शहरात उत्तर भारतीय, सिंधी, गुजराती, दक्षिण भारतीय, मुस्लिम, मारवाडी अश्यांसारखे कितीतरी समाजाचे लोक या ठिकाणी स्थलांतरीत झालेले आणि आपले उद्योग व्यवसाय मोठया प्रमाणात विस्तारीत केलेले पहायला मिळतात.

तलावांचा जिल्हा म्हणून देखील ठाणे जिल्हा ओळखला जातो. जवळजवळ ३५ तलाव या शहरात आपल्याला पहायला मिळतात, त्यातला मासुंदा तलाव अधिक सुंदर आणि परिसर प्रसन्न आहे.शहरात अनेक हिरव्यागार निसर्गरम्य टेकडया व डोंगर बघायला मिळतात.

तालुक्यातील गावे

[संपादन]
  1. बाले
  2. बामळी
  3. भंडार्ली
  4. दहिसर (ठाणे)
  5. गोटेघर
  6. मोकाशी
  7. नागाव (ठाणे)
  8. नारिवळी
  9. नवाळी
  10. निघु
  11. पिंपरी (ठाणे)
  12. उत्तरशिव
  13. वाकळण
  14. वाईवळी

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

इतिहास

[संपादन]

ठाणे हे अतिशय जुने शहर आहे. ह्या शहराचे उल्लेख मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतात. हे शहर शिलाहार राजांची राजधानी होती. इटालियन प्रवासी मार्को पोलोने १२९० मध्ये ठाण्याला भेट दिली. ठाणे हे विकसित झालेले सुंदर शहर असल्याचा उल्लेख तो करतो. तसेच ठाणे हे मोठे बंदर असून तेथील व्यापारी कापूस, ताग आणि चामडे विकतात आणि घोडे खरेदी करतात असे तो म्हणतो.

पोर्तुगीज ठाण्यात १५३० मध्ये आले आणि त्यांनी शहरावर १७३९ पर्यंत सुमारे २०० वर्षे राज्य केले. मराठ्यांनी शहरावर १७३९ ते १७८४ राज्य केले. १७८४पासून स्वातंत्र्यापर्यंत शहर इंग्रजांच्या ताब्यात होते. भारताच्या पहिली रेल्वे बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ,मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये धावली.

ठाणे महानगरपालिका १९८२ साली स्थापन झाली.

भौगोलिक स्थान

[संपादन]
ठाणे जिल्हा: रसिक स्थळे (१८९६ चा नकाशा)

हवामान

[संपादन]

ठाणे जिल्ह्याचे हवामान उष्णकटिबंधीय मॉन्सून हवामान आणि उष्णकटिबंधीय आर्द्र व कोरडे हवामान यांच्या सीमेवर आहे. एकूण हवामान समतोल असून भरपूर पाऊस पडणारे दिवस व अत्यंत तापमानाचे दिवस कमी असतात.

ठाण्यातील तापमान २२°C ते ३६°C दरम्यान बदलत असते. हिवाळ्यात तापमान रात्री १२°C पर्यंत खाली येऊ शकते, तर उन्हाळ्यात दुपारी ४०°C पेक्षा जास्त होऊ शकते. सर्वात कमी दिवसाचे तापमान प्रामुख्याने जुलै आणि ऑगस्टमधील पावसाळ्याच्या शिखरावर पाहिले जाते, जेव्हा तापमान सुमारे २५°C पर्यंत घसरते. जून ते ऑक्टोबर दरम्यान सुमारे ८०% वार्षिक पाऊस पडतो. सरासरी वार्षिक पाऊस २०००–२५०० मिमी नोंदवला जातो, आणि आर्द्रता पातळी ६१% ते ८६% दरम्यान असते, ज्यामुळे हा भाग आर्द्र क्षेत्रात मोडतो.

ठाणे (१९९१-२०२०) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) ३६.८ ४०.७ ४२.४ ४३.२ ३९.३ ३८.२ ३४.७ ३३.३ ३३.८ ३७.८ ३७.० ३६.२ nil
(nil)
सरासरी कमाल °से (°फॅ) ३२.५ ३३.९ ३५.१ ३६.१ ३५.० ३३.५ ३१.२ ३०.४ ३१.१ ३४.० ३४.१ ३३.४ ३३.५
सरासरी किमान °से (°फॅ) २०.० २०.६ २२.१ २४.३ २५.३ २३.६ २५.० २५.० २४.४ २४.२ २२.६ २१.१ २३.०
विक्रमी किमान °से (°फॅ) १२.७ ११.६ १८.२ २०.० २२.८ २०.२ २१.३ २१.८ १९.८ १९.६ १७.० १५.० nil
(nil)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) ३.१ १.० १.५ २.३ २५.१ ५४१.३ ९२२.० ५३९.७ ३२६.९ ९३.२ १९.१ २.३ २४७७.५
स्रोत #1: भारत हवामान विभाग[]
स्रोत #2: महाराष्ट्र शासन (पर्जन्यमान)

ठाणे हे भारतातील ‘स्वच्छ वायु सर्वेक्षण २०२४’ च्या निकालांनुसार राष्ट्रीय स्वच्छ वायू शहरांमध्ये (वर्ग १ >१० लाख लोकसंख्या) १२व्या क्रमांकावर आहे.[]

लोकसंख्या

[संपादन]
ठाण्यातील धर्म (२०११)[]
धर्म टक्केवारी
हिंदू धर्म
  
76.91%
इस्लाम
  
17.96%
बौद्ध धर्म
  
4.18%
ख्रिश्चन धर्म
  
1.88%
जैन धर्म
  
1.40%
इतर
  
0.67%

साचा:Historical population

२०११ च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या १८,८६,९४१ आहे.[] ठाणे शहराचा सरासरी साक्षरता दर ९१.३६ टक्के आहे, जिथे पुरुष साक्षरता ९४.१९ टक्के तर स्त्री साक्षरता ८८.१४ टक्के आहे. ठाणे शहराचा लैंगिक गुणोत्तर १००० पुरुषांमागे ८८२ स्त्रिया आहे. बाल लैंगिक गुणोत्तर १००० मुलांमागे ९०० मुली आहे. जनगणना अहवाल २०११ नुसार ठाणे शहरातील एकूण ०–६ वयोगटातील मुलांची संख्या १,८६,२५९ आहे. त्यापैकी ९८,०१७ मुले आणि ८८,२४२ मुली आहेत. मुलांची संख्या ठाणे शहराच्या एकूण लोकसंख्येच्या १०.२४% आहे.

संस्कृती

[संपादन]

ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात. गणेशोत्सव आणि नवरात्र हे ठाण्यातील मुख्य उत्सव आहेत. ठाण्यातले गडकरी रंगायतन विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर आहे. ठाण्यातील राम मारूती रस्ता आणि गोखले रस्ता हे उपहारगृहे , कपडे, पुस्तके, संगणक ह्यांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहेत.

ठाण्यात दही हंडी उत्सव फार उत्साहात साजरा केला जातो. येथे ठाणे शहर, मुंबई व उपनगरातून गोविंदा पथक ह्या उत्सवात सहभाग घेण्यासाठी येतात.

कुंजविहार आणि राजमाता ह्यांचे वडापाव आणि टिप-टॉपचे खाद्यपदार्थ आणि मिठाई विशेष प्रसिद्ध आहेत. २०१५ साली 'मेतकूट' नावाचे उपहारग्रृह नौपाडा, घंटाली येथे सुरू झाले. महाराष्ट्राच्या सर्व प्रांतातील ( कोकण, पश्चीम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ) खाद्यपदार्थ या एकाच ठिकाणी उपलब्ध झाले. ठाण्यात आता विविध मल्टिप्लेक्स थियेटर्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत.

ठाण्यातील प्रमुख भाषा मराठी आहे. ठाण्याच्या खत्री वॉर्डमधील काही ईस्ट इंडियन कुटुंबे अजूनही पोर्तुगीज बोलतात.[] भारतातील सुमारे ५,००० यहुदींपैकी सुमारे १,८०० यहुदी ठाण्यात राहतात.[]

Languages in Thane (2011)[]

  मराठी (48.50%)
  हिंदी (19.59%)
  उर्दू (12.99%)
  कन्नड (1.37%)
  बंगाली (1.21%)
  तमिळ (1.15%)
  कोंकणी (0.94%)
  Others (5.45%)

२०११ च्या जनगणनेच्या वेळी, ठाण्यातील ४८.५०% लोक मराठी, १९.५९% हिंदी, १२.९९% उर्दू, ३.९३% गुजराती, २.४४% भोजपुरी, १.३७% कन्नड, १.२९% मल्याळम, १.२१% बंगाली, १.१५% तमिळ, १.१४% मारवाडी आणि ०.९४% कोंकणी ही मातृभाषा म्हणून बोलत होते.[]

क्रिकेट हा ठाण्यातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. \[\[दादोजी कोंडदेव स्टेडियम]] हे ठाण्यातील क्रिकेटसाठी प्रसिद्ध मैदान आहे. ठाणे \[\[मुंबई क्रिकेट असोसिएशन]]च्या कार्यक्षेत्राखाली येते, जी मुंबईतील क्रिकेटची नियामक संस्था आहे. येथील खेळाडू भारतीय स्थानिक क्रिकेट स्पर्धेत \[\[मुंबई क्रिकेट संघ]]ासाठी खेळतात.[]


वाहतूक व्यवस्था

[संपादन]

ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वाहतूक व्यवस्था पुरवते. बेस्ट ठाण्याच्या तीन हात नाक्यापासून आणि ठाणे पूर्व स्थानकापासून मुंबईत बससेवा पुरवते. नवी मुंबई परिवहन (एन. एम. एम. टी.) ठाण्यातील चेंदणी नाक्यापासून नवी मुंबईत बससेवा पुरवते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.) ठाणे ते बोरिवली, भायंदर, पनवेल ह्या मध्यम पल्ल्याच्या सेवा आणि इतर शहरांसाठी लांब पल्ल्याच्या बससेवा पुरवते.

ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे - वाशी ही लोकलसेवा नवीन सुरू झाली आहे.

ठाणे महानगरपालिकेने रिंगरूट प्रकल्पासाठी म्हणजेच अंतर्गत मेट्रो प्रकल्पासाठी प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांसह नाशिक निओ मेट्रो आणि नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरच घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेत दिली[]

शिक्षण

[संपादन]

शाळा

ठाण्यातील काही प्रमुख शाळा:

डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, ठाणे

युरोस्कूल, ठाणे वेस्ट

हिरानंदानी फाउंडेशन स्कूल

होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल

लिटिल फ्लॉवर हायस्कूल, ठाणे

न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूल, ठाणे

पोदार इंटरनॅशनल स्कूल[१०]

स्मित. सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल

श्री मा विद्यालय, पाटलीपाडा, ठाणे

सेंट जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूल, ठाणे

वसंत विहार हायस्कूल

महाविद्यालये व संस्था ठाण्यातील काही प्रमुख महाविद्यालये व शिक्षणसंस्था:

ए. पी. शाह टेक्नॉलॉजी इंस्टिट्यूट

डॉ. वि. एन. बेडेकर व्यवस्थापन अभ्यास आणि विधी संस्था

व्यवस्थापन व संगणक अभ्यास संस्था

केसी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, ठाणे

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय

रुस्तमजी अकादमी फॉर ग्लोबल करिअर्स[११]

विद्या प्रसारक मंडळाचे पॉलिटेक्निक

प्रसिद्ध व्यक्ती

[संपादन]

ठाणे शहराशी संबंधित काही नामवंत व्यक्ती:

अमृता अरोरा, चित्रपट अभिनेत्री

मलायका अरोरा, चित्रपट अभिनेत्री आणि नृत्यांगना

जितेंद्र आव्हाड, भारतीय राजकारणी

आनंद दिघे, माजी राजकारणी, "धर्मवीर" ह्या सन्माननीय उपाधीने परिचित. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख

ह्रुता दुर्गुळे, भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री

पूर्वा गोकळे, दूरचित्रवाणी अभिनेत्री

अविनाश जाधव, राजकारणी

सुहास जोशी, चित्रपट-दूरचित्रवाणी अभिनेता

उमेश कामत, चित्रपट-दूरचित्रवाणी अभिनेता

संजय मुकुंद केळकर, राजकारणी

प्राजक्ता कोळी, यूट्यूबर

कविता लाड, चित्रपट-दूरचित्रवाणी अभिनेत्री

प्रमोद महाजन, भारतीय राजकारणी

प्रिया मराठे, दूरचित्रवाणी अभिनेत्री

संजीव नाईक, राजकारणी

आनंद परांजपे, राजकारणी

प्रकाश विष्णनाथ परांजपे, राजकारणी

रवींद्र फाटक, राजकारणी

सतीश प्रधान, स्थानिक राजकारणी

प्रताप सरनाईक, राजकारणी

पृथ्वी शॉ, व्यावसायिक क्रिकेटपटू

एकनाथ शिंदे, सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

श्रीकांत शिंदे, भारतीय राजकारणी

अनंत तारे, स्थानिक राजकारणी

लक्ष्मी नारायण त्रिपाठी, भारतीय LGBT कार्यकर्ती

राजन विचारे, स्थानिक राजकारणी

पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे

[संपादन]
  1. गडकरी रंगायतन,
  2. मासुंदा तलाव,
  3. राम मारूती रस्ता,
  4. येऊर,
  5. उपवन,
  6. कोपनेश्वर मंदिर,
  7. वर्तकनगर साईबाबा मंदिर,
  8. घंटाळी मंदिर,
  9. पोर्तुगीजानी १५८२ साली बांंधलेले सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्च.
  10. ज्यू समाजाचे शाआर हाशमाईम
  11. पेशवेकालीन विठ्ठल मंदिर
  12. मामा भाचा डोंगर

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. ^ "भारतातील निरीक्षणांची हवामानविषयक माहिती १९९१-२०२०" (PDF). भारत हवामान विभाग. ८ एप्रिल २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "स्वच्छ वायु सर्वेक्षण २०२४" (PDF). स्वच्छ वायु सर्वेक्षण २०२४. ७ सप्टेंबर २०२४. 2024-09-14 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2025-05-28 रोजी पाहिले.
  3. ^ "तक्ता C-16 धर्मानुसार लोकसंख्या: महाराष्ट्र". census.gov.in. भारताचे निबंधक आणि जनगणना आयुक्त. २०११.
  4. ^ भारत जनगणना: उप-जिल्ह्यांची माहिती Archived २१ जुलै २०११, at the Wayback Machine.. Censusindia.gov.in. १६ जुलै २०१३ रोजी मिळवले.
  5. ^ ठाणे गॅझेटियर: लोकसंख्या: ख्रिश्चन – भाषण Archived १० नोव्हेंबर २०१०, at the Wayback Machine.. Maharashtra.gov.in. २१ जानेवारी २०१२ रोजी मिळवले.
  6. ^ "ठाण्यातील यहुदी". द टाइम्स ऑफ इंडिया. २० ऑक्टोबर २०१३. २३ डिसेंबर २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ a b [[१](https://censusindia.gov.in/nada/index.php/catalog/10253/download/13365/DDW-C16-TOWN-STMT-MDDS-2700.XLSX) "Table C-16 Population By Mother Tongue: Maharashtra (Town level)"] Check |url= value (सहाय्य). census.gov.in. \[\[Registrar General and Census Commissioner of India]]. 2011.
  8. ^ [[२](http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20230202_12_11) "महिला आयपीएल लिलावा ठाण्यात"] Check |url= value (सहाय्य) [Women's Premier League auction in Thane.]. \[\[Lokmat]]. 2 February 2023. p. 10. 2 February 2022 रोजी पाहिले.
  9. ^ "Thane Metro News : ठाणे शहराच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला". The GNP Marathi Times. 2022-02-13. 2022-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-13 रोजी पाहिले.
  10. ^ "Podar International School". podareducation.org. 13 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 April 2019 रोजी पाहिले.
  11. ^ "Best Vocational Education & Training Courses Institute in India | RAGC". Rustomjee Academy For Global Careers (इंग्रजी भाषेत). 12 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 April 2019 रोजी पाहिले.