शिवाजीराव पटवर्धन
शिवाजीराव पटवर्धन (इ.स. १८९२ - इ.स. १९८६) हे मराठी समाजसेवक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्ते होते. यांचा जन्म 28 डिसेंबर 1892 रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे झाला. लहान वयात आई वडिलांचे छत्र हरविले त्यामुळं त्यांचा सांभाळ मोठी बहीण बहिनाक्का यांनी केला.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रातील अमरावती येथे इ.स. १९५० साली कृष्ठरोग्यांसाठी 'विदर्भ महारोगी सेवा मंडल तपोवन' निवासी सेवा आश्रम स्थापला. भारताला स्वातंत्र्य मिळाले नंतर शासनामध्ये कुठलेही लाभाचे पद न स्वीकारत त्यांनी आपले पुढील आयुष्य कुष्ठ सेवा करण्यात घालविले. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल भारताच्या केंद्रशासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.[ संदर्भ हवा ]
पटवर्धन पेशाने होमिओपॅथी वैद्यकशास्त्रातील वैद्य होते.[ संदर्भ हवा ] इ.स. १९२०पासून ते सक्रिय राजकारणात सहभागी झाले. ते काही काळ विदर्भ प्रांतिक काँग्रेस समितीचे सचिव होते.[ संदर्भ हवा ]
विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन आजही तेवढ्याच जोमानं आपले कार्य करत आहे.