डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार | |
---|---|
प्रयोजन | सामाजिक क्षेत्रातील योगदान |
Venue | महाराष्ट्र |
देश | भारत |
प्रदानकर्ता | महाराष्ट्र शासन |
प्रथम पुरस्कार | १९८९-९० |
शेवटचा पुरस्कार | २०१७-१८ |
संकेतस्थळ | www.sjsa.maharashtra.gov.in |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तर १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी या पुरस्काराचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार असे होते.[१]
दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थाना पुरस्कार देण्यात येतो. २ एप्रिल २०१२ च्या शासन निर्णयान्वये या पुरस्काराचे नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण’ असे करण्यात आले आहे.[२]
निकष व अटी
[संपादन]महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी खालील निकष व अटी ठरवलेल्या आहेत.[३]
- व्यक्तींसाठीचे निकष
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा १० वर्षाचा अनुभव.
- व्यक्तींकरिता वयाची अट पुरुषांसाठी ५० वर्षे आणि महिलांसाठी ४० वर्षे आहे.
- संस्था
- संस्थेत कोणताही गैरव्यवहार नसावा.
- संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य आवश्यक.
- मागील ५ वर्षाचे लेखा परिक्षण अहवाल आवश्यक.
- या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० व संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत असाव्यात.
- या संस्था राजकारणापासून अलिप्त असाव्यात.
शिफारश पद्धती
[संपादन]या पुरस्कारासाठी शिफारश पद्धती खालीलप्रमाणे आहे.[३]
- व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र
- विना दुराचार प्रमाणपत्र
- गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र
- सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र
- संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशिल
पुरस्काराचे स्वरूप
[संपादन]पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. १५,०००/- व प्रती संस्था रू. २५,०००/- एवढी निश्चित केलेली आहे. हा पुरस्कार दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थाना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल - आंबेडकर जयंती रोजी प्रदान करण्यात येतो.[३]
पुरस्कार विजेते
[संपादन]१९९२
[संपादन]१९९७
[संपादन]२००९
[संपादन]२०१२
[संपादन]- दिलीपराव आगळे
- सिंधुताई सपकाळ[४]
२०१७-१८
[संपादन]राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना २०१७-१८ साठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये खालील मराठवाड्यातील व्यक्तींचा समावेश आहे.[५]
- डॉ. ऋषिकेश भीमराव कांबळे
- यादव सीताराम तामगाडगे
- केशव गोरोबा कांबळे
- पंडित केरबा सूर्यवंशी
- माजीद गफूरसाब मोमीन
- भीमराव नागराव हत्तीअंबिरे
- साहेबराव कामाजीराव कांबळे
- सूरजितसिंह रामसिंह वाघमारे (ठाकूर)
- शंकर चन्नापा वीटकर
२०१८-१९
[संपादन]- कवी-बादशाह सैय्यद
हे सुद्धा पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
- संत रविदास पुरस्कार
- कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार
- शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
- व्यसनमुक्ती पुरस्कार
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ https://sjsa.maharashtra.gov.in/mr/government-resolutions
- ^ "http://www.mumbaitarunbharat.in/Encyc/2016/8/17/samajik-nyaya-v-vishesh-sahya-vibhag". www.mumbaitarunbharat.in. 2018-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-14 रोजी पाहिले. External link in
|title=
(सहाय्य) - ^ a b c "सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार. | Social Justice & Special Assistance Department". sjsa.maharashtra.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-18 रोजी पाहिले.
- ^ "सिंधुताई सपकाळसह ७१ जणांना समाजभूषण पुरस्कार प्रदान". marathibhaskar. 2012-04-15. 2018-05-18 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "News| Latest News in Marathi | Live Updates in Marathi | Lokmat.com". http://www.lokmat.com. 2018-05-14 रोजी पाहिले. External link in
|work=
(सहाय्य)