सागर देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सागर देशमुख
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, वकिली
भाषा मराठी
प्रमुख नाटके पिया बहरूपिया
चहेता
प्रमुख चित्रपट वायझेड
भाई : व्यक्ती की वल्ली
प्रमुख टीव्ही कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा

सागर देशमुख हे मराठी नट, चित्रपट अभिनेता व वकील आहेत. त्यांचे वडीलही वकील होते. सागर देशमुख हे पुण्याच्या लॉ कॉलेजचे विद्यार्थी होते. २००३ मध्ये ते वकिलीची परीक्षा पास झाले. वकिलीच्या परीक्षेनंतर मुंबईत त्यांनी चार व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर पुन्हा पुण्यात येऊन त्यांनी वकिली सुरू केली. ६-७ वर्ष त्यांनी न्यायालयात जाऊन वकिलीचा व्यवसाय केला. त्यानंतर ते सोडून लेखन आणि अभिनयाकडे वळले. 'वायझेड' हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता.

सागर देशमुख यांनी भाई : व्यक्ती की वल्ली चित्रपटात पु.ल. देशपांडे यांची भूमिका साकारली. सध्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा या दूरचित्रवाणी मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका करत आहेत.[१][२] मोहित टाकळकरांनी दिग्दर्शित केलेल्या 'चहेता' नावाच्या हिंदी नाटकात ते काम करत आहेत. 'आसक्त कलामंच' या त्यांच्याच संस्थेचे ते नाटक आहे.

सागर देशमुख यांनी भालबा केळकर, श्रीराम लागू आदी मान्यवरांनी स्थापन केलेल्या 'प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन' या नाट्यसंस्थेत २२ दिवसांच्या नाट्य कार्यशाळेत दाखल झाले होते. तेथेच त्यांना नाटकाची आवड लागली. त्यानंतर ते नेहमी प्रायोगिक नाटके करत राहिले. हिंदी, मराठी आणि इंग्रजी प्रायोगिक नाटके केली. पुढे जाहिराती आणि चित्रपट केले. त्यांनी 'पिया बहरूपिया' नावाचे शेक्सपियरच्या Twelfth Nightचे हिंदी रूपांतर असलेले नाटक केले, त्याचा पहिला प्रयोग लंडनच्या शेक्सपिअर्स ग्लोब थिएटरमध्ये झाला.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Sagar Deshmukh: सागर देशमुख पुलंनंतर साकारणार बाबासाहेब". Maharashtra Times. 2019-04-02 रोजी पाहिले.
  2. ^ टीम, एबीपी माझा वेब. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेत 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत". ABP Majha. 2019-03-28 रोजी पाहिले.
  3. ^ "'हे तर माझ्यातील अभिनेत्याला आव्हान'". Loksatta. 2019-07-28 रोजी पाहिले.