दादर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?दादर
मुंबई • महाराष्ट्र • भारत
—  उपनगर  —
गुणक: 19°01′N 72°50′E / 19.01, 72.84
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा मुंबई शहर
भाषा मराठी

गुणक: 19°01′N 72°50′E / 19.01, 72.84 दादर हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

दादर हे मुंबईतील एक उपनगर आहे.

इतिहास[संपादन]

दादर या शब्दाचा अर्थ जिना किंवा शिडी असा आहे. पूर्वी परळ आणि माहिम यांच्यामधे फार थोडे चालायचे रस्ते होते. इतरत्र माळरान, खाड्या आणि डबकी होती. या भागातील लोकांनी ही जागा दगड-मातीने भरली. अशाप्रमाणे दादरने सखल परळला थोड्या उंचावरच्या माहिमला जोडले. म्हणून दादर ह्या नावाने प्रसिद्ध झाले.

१८९९- १९०० दरम्यान दादर- माटुंगा- वडाळा-शिव हा सगळा परिसर योजनाबद्ध विकसित केलेला मुंबईतील पहिला उपनगरी भाग होता. १८९० च्या दरम्यान आलेल्या प्लेगच्या साथीमुळे शहर विकास प्राधिकरणाने एक विकास योजना तयार केली जेणेकरून मुख्य शहरा मधील गजबजाट कमी करता यावा. त्यावेळी करण्यात आलेल्या परीक्षणा प्रमाणे दादर माटुंगा परिसरात ६०,००० च्या आसपास, त्याच संख्येत माटुंगा शिव परिसरात आणि ८५,००० च्या आसपास लोकांना शिवडी-वडाळा परिसरात वसवण्याचे योजले होते.

योजने प्रमाणे बांधकामांस सुरवात झाली. यात प्रमुख भर हा सांडपाण्याच्या व्यवस्थेवर होता. इमारतींची उंची तीन मजल्यांपेक्षा जास्त नसावी तसेच दोन इमारतींमध्ये योग्य अंतर असावे असे ठरले. या योजनेत रहिवाशी इमारतीं सोबतच व्यावसायिक आणि शैक्षणिक इमारतीसुद्धा होत्या. खेळाची मैदाने तसेच उद्यानांसाठी हि जागा राखून ठेवण्यात आली होती.

जवळजवळ ४४० एकर (१.८ चौ.किमी ) इतकी जमीन याकरता संपादित करण्यात आली होती. या नव्याने विकसित केलेल्या परिसराचा फायदा उठवण्यासाठी पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थाची निर्मिती करण्यात आली. दादरच्या पारशी आणि हिंदू वसाहती तसेच माटुंग्याची तमिळ वसाहत या अशाच प्रकारे विकसित करण्यात आल्या होत्या.

नव्याने बांधण्यात आलेल्या मोहम्मद आली मार्गावरून प्रवास करता दादर महत्मा फुले मंडई ( तेव्हा क्रॉफर्ड मार्केट) पासून सहा मैलांवर होते. त्याच बरोबरीने ट्रामचा विस्तार हि या नवीन उपनगरा पर्यंत करण्यात आला. फेब्रुवारी १९२५ च्या दरम्यान ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेने उपनगरी मार्गावर काम करण्यास सुरवात केली.

शहर विकास प्राधिकरणाच्या योजनेनुसार वीरमाता जिजाबाई तंत्रशिक्षण संस्था (तेव्हा व्ही.जे.टी.आय. ) आणि राजा शिवाजी विद्यासंकुल (तेव्हा किंग जॉर्ज स्कूल) या शैक्षणिक संस्थाची दादर परिसरात स्थापना करण्यात आली. १९३५ च्या दरम्यान रामनारायण रुईआ आणि १९३९ च्या दरम्यान रामनिरंजन पोद्दार या महाविद्यालयांची सुरवात झाली.

१९३७ पर्यंत शिवाजी पार्क आणि सभोवतीचा परिसर विकसित झाला.

रेल्वे स्थानके[संपादन]


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं मुंबईतल्या सगळ्या एरियांच फादर असतं! दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं

श्रीसिद्धिविनायकाचं हे गांव, साऱ्या भारतात प्रसिद्ध ह्याचं नांव पार्कात विराजती उद्यान गणेश नांवाजलेली शाळा-कॊलेजं म्हणजे साक्षात श्रीसरस्वतीचा प्रदेश! विद्यार्जन नि विद्यादानाला जे सदैव सप्रेम सादर असतं ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं!

वसंत देसाई, वसंत प्रभू सी रामचंद्र नि सुधीर फडके दादरचेच तर होते ब्रॊडवे समोरच्या फूटपाथवर चक्क नौशादसाहेब झोपत होते! मीनाकुमारी ’रूपतारा’त चहा द्यायला जायची ‘रणजित’ समोरच्या बसंती हॊल मधे लताजींची रिहर्सल चालायची! असं माझं दादर, कला-संगीताचं माहेरघर असतं… म्हणूनच गडया, दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...

छबिलदासचा फर्मास बटाटावडा नि शिवाजी मंदिरला ’वस्त्रहरण’ नाटक संपलं की ’सिंधुदुर्गा’ वर नायतर नाकासमोरच्या गोमांतकात, खेकडयाचा रस्सा नि खमंग सुरमईचं दादर हे एक झणझणीत चमचमीत डिनर असतं ही मज्जा कुठ्ठेच नाही, म्हणूनच तर मित्रा.. दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...

शिवाजी पार्कच्या मैदानाला एक किलोमीटरचा कटटा असतो, तरुणांपासून ते पेन्शनरांपर्यंत इथे प्रत्येकाचा हक्काचा अड्डा असतो! चौपाटीच्या भेळेला सूर्यास्ताचा रंग असतो ’सीसीडी’ किंवा ’बरिस्ता’वाल्या पब्लिक चा मात्र निराळाच ढंग असतो! पण कितीही विदेशी रेस्तरां आले तरी काला-खटटा च्या गाडीवर मात्र गि-हाईक हमेशा हजर असतं... नो वंडर देन, की दादर म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं

हिंदमाता पासून ते पार स्टेशनपर्यंत साधना च्या डोशापासून ते कैलाश च्या लस्सीपर्यंत लग्नाच्या साडयांपासून पंजाबी ड्रेस पर्यंत फाळके रोडवर खरेदी करा पाय दुखेपर्यंत! पश्चिमेचा बाजार नि चोवीस तास वर्दळ फुलबाजारात घुमतो लिली-गुलाबाचा दर्वळ भाजीच्या गल्लीत नकळत बसतो धक्का गरम इडली ’विसावा’ची नि सामंतांचा चक्का अंडयापासून गेंडयापर्यंत नि पिनपासून पियानोपर्यंत दादरमध्ये खरेदीला कधीच नसतो अंत! हज्जारो विक्रेत्यांच्या पोटापाण्याचं साधन असतं दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...

पोर्तुगीज चर्चची घंटा घणघणते दूर नि पूर्वेकडच्या मशिदीत बांगेचा सूर इकडे गुरुद्वारा तिकडे स्वामीनारायण नि पारशांच्या अग्यारीत रमतो अग्निनारायण सग्गळ्या धर्मांचं जिथे एक गेट-टुगेदर असतं ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं ज्यांच्या वाडवडिलांची असते बख्खळ पुण्याई त्याच लोकांचं इथे घर असतं, दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं....