विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विमानतळ(विमानाचा थांबा)(इंग्लिश:Airport मराठीत उच्चार व लिखाण- एअरपोर्ट) :एक दळणवळणाचे स्थान/ठिकाण किंवा निश्चित मानव नियंत्रीत ठिकाण जे विमान उड्डाणाकरीता (निर्गमन) व उतरविण्याकरीता (आगमन) वापरले जाते. विमानाने आकाशात भरारी मारण्यासाठी व उतरण्यासाठी ज्या विशेष तांत्रिक सोयीसुविधा आवश्यक असतात त्या एका व्यावसायिक विमानतळावर उपलब्ध असतात. मोठी विमानतळे प्रवाशांच्या आगमन व निर्गमनाकरीता तसेच सामान व मालाच्या वाहतूकीकरता देखील वापरली जातात.मोठ्या विमानतळांवर विमानांच्या निर्वहन,बिघाड-दुरुस्तीइंधन भरण्याची सोय अशा अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केलेल्या असतात.

फ्रँकफर्ट विमानतळ

विमानतळावर विमान-उड्डाणासाठी व उतरविण्यासाठी आवश्यक असा सुयोग्य रस्ता आखलेला असतो त्यास धावपट्टी असे संबोधतात.हि धावपट्टी त्या त्या विमानतळाच्या वाहतू़क व वापरावर आधारीत लांबीची तसेच आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सुनिश्चित केलेली असते.जगातील पहिले नागरी विमानतळ अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील न्युजर्सी राज्यातील नेवार्क (Newark)या ठिकाणी बांधल्या गेले.