बिस्मिल्ला खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बिस्मिल्ला खाँ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बिस्मिल्ला खॉं
Bismillah at Concert1 (edited).jpg
जन्म कमारुद्दीन खान
२१ मार्च, इ.स. १९१६
डुमरॉंव, बिहार
मृत्यू २१ ऑगस्ट, इ.स. २००६
वाराणसी उत्तरप्रदेश
मृत्यूचे कारण वृद्धापकाळाने
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा सनईवादन
धर्म मुस्लिम
वडील पैगंबर खान
आई मिठान
पुरस्कार पद्मश्री(१९६१), पद्मभूषण(१९६८), पद्मविभूषण(१९८०), भारतरत्न(२००१)

उस्ताद बिस्मिल्ला खॉं (जन्म : डुमरॉंव - बिहार, मार्च २१, १९१६ : - वाराणसी, ऑगस्ट २१, २००६) हे ख्यातनाम भारतीय सनईवादक होते.

उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ ( जन्म २१ मार्च १९१६ - मृत्यु २१ ऑगस्ट  २००६) भारतातील प्रख्यात शहनाई वादक होते. त्यांचा जन्म डुमराव बिहार बिहार मध्ये झाला.  सन् २००१ मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' देऊन सन्मानित केल्या गेले. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ हे भारतील तीसरे संगीतकार होते की ज्यांना  भारतातील सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' देऊन सन्मानित केल्या गेले होते. त्यांच्या वडिलांचे नाव  पैगम्बर ख़ाँ आणि आईचे नाव  मिट्ठन बाई होते. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ यांचे लहानपणीचे नाव  कमरुद्दीन होते परंतु ते  बिस्मिल्लाह नावाने प्रसिद्ध होते, ते आई वडिलांचे दुसरे अपत्य होते . उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ यांचा परिवार  बिहारमधील  भोजपुर रियासत मध्ये आपला संगीतातील हुनर दाखविण्या करिता नेहमी रियासतीत जात होते. त्यांचे वडील बिहारच्या  डुमराँव रियासत चे  महाराजा केशव प्रसाद सिंह यांच्या दरबारात शहनाई वाजवायला जायचे. ६ वर्षेचे असतांना बिस्मिल्ला खाँ आपल्या वडिलांसोबत वाराणसीला आले. वाराणसी मध्ये बिस्मिल्ला खाँ यांनी आपले मामा  अली बख्श 'विलायती' यांच्या कडून शहनाईचे शिक्षण घेतले . त्यांचे मामा उस्ताद 'विलायती'  हे विश्वनाथ मंदिरात स्थायी स्वरूपात  शहनाई-वादनाचे काम करायचे. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ काशीच्या बाबा विश्वनाथ मंदिरात जाऊन शहनाई तर वाजवायचेच त्यासोबत गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसून खूप रियाज करायचे.   ते पाच वेळचे नमाजी होते . बनारस सोडण्याच्या विचाराने सुद्धा ते व्यथित होऊन जायचे कि आपल्याला गंगाजी आणि काशी विश्वनाथा पासून दूर जावे लागेल, कारण ते यांच्या पासून दूर राहू शकत नव्हते. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ हे जात पात मनात नव्हते त्यांच्या करिता संगीत हाच एक धर्म होता . उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ हे खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचे सशक्त प्रतीक होते. अश्या या महान संगीतकाराचा मृत्यू  २१ ऑगस्ट  २००६ रोजी वाराणसी येथे झाला. 

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ यांना मिळालेले पुरस्कार -: पद्मश्री (१९६१),  पद्मभूषण  (१९६८),   पद्मविभूषण  (१९८०),   भारतरत्न(२००१)
  • बिस्मिल्ला खॉं यांच्या जीवनावर एक लघुपट आहे. डॉ. के. प्रभाकर यांनी तो दिग्दर्शित केला आहे.