परिनिर्वाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बुद्धाचा मृत्यू किंवा महापरिनिर्वाण, गांधार शैली दुसरे-तिसरे शतक

बौद्ध मतानुसार परिनिर्वाण म्हणजे (संस्कृत: परिनिर्वाण; पाली: परिनिब्बान; चिनी: 般涅槃) अखेरचे निर्वाण असून बोधी (संपूर्ण जागृती) प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या शरीराच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण घडते. भावचक्र, संसार, कर्म आणि पुनर्जन्म यांच्यातून संपूर्ण मुक्ती परिनिर्वाणात साधली जाते.

महापरिनिब्बान सुत्तात बुद्धाच्या परिनिब्बानाचे वर्णन आहे. तपशिलात वर्णन असल्याने थेरवाद परंपरेतील महापरिनिब्बाण सुत्त बुद्धाच्या मृत्यूनंतर हजारो वर्षांनी लिहिले गेले असले तरी बुद्धाच्या आयुष्यातील घटनांसाठीचा तो अधिक विश्वासार्ह संदर्भ मानला जातो.