औरंगाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख औरंगाबाद शहराविषयी आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


Disambig-dark.svg
  ?औरंगाबाद
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
अजंठा लेणी
अजंठा लेणी
गुणक: 19°52′48″N 75°19′12″E / 19.88°N 75.32°E / 19.88; 75.32
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १३८.५ चौ. किमी
जिल्हा औरंगाबाद
लोकसंख्या
घनता
८,७२,६६७[१] (२००१)
• ६,३०१/किमी
महापौर त्र्यंबक तुपे
महानगरपालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया
पोलीस आयुक्त यशस्वी यादव
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४३१००१
• +०२४०
• MH-20
संकेतस्थळ: औरंगाबाद महापालिका संकेतस्थळ

गुणक: 19°52′48″N 75°19′12″E / 19.88°N 75.32°E / 19.88; 75.32 औरंगाबाद ( मराठी: औरंगाबाद, उर्दू: اورنگ‌آباد), महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. ते मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. औरंगाबाद हे नाव औरंगजेब (इ.स. १६५९ - इ.स. १७०७) ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून त्याच्या मृत्यूनंतर ठेवले गेले असावे. जुने नाव खडकी होते . औरंगाबादला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादेत आहे. औरंगाबाद हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिकशहर आहे. हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे..[२]

इतिहास[संपादन]

औरंगाबाद आज जेथे वसलेले आहे त्या खाम नदीच्या तीरावर याच जागी खडकी नावाचे प्राचीन गाव वसलेले होते. काही इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले असा दावा केला जातो. परंतु हे गाव अस्तित्त्वात होते फक्त त्याचे नामकरण केले गेले. मलिक अंबरने ह्या शहराचे नाव फतेहपूर ठेवले. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी / फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आला. १६४४ मध्ये तो आग्र्याला परत गेला. त्या नंतर १६८१ मध्ये औरंगजेब मुघल बादशाह असताना पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगजेब इथेच राहिला. औरंगाबाद शहराजवळ असणार्‍या खुलताबाद या छोट्याश्या गावात औरंगजेबाची कबर आहे. १७०७ नंतर औरंगाबादचा ताबा पुढे हैदराबादच्या निझाम राजवटीचा भाग म्हणून राहिले. इ.स. १८८९ मध्ये औरंगाबादेत पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला. निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅलि रेल्वेची सुरवात झाल्यानंतर इ. स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनींग कारखाने सुरु झाले. औरंगाबाद हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे.औरंगाबाद शहरात ५२ दरवाजे व खिडक्या प्रसिद्ध आहेत. सद्यस्थितीतील यातील अनेक दरवाजे हे शेवटची घटका मोजत आहेत. औरंगाबाद शहर ज्या परिसरात वसलेले आहे,त्याचा इतिहास तसा फार जुना आहे सातवाहन काळापर्यंत याच्या पाऊलखुणा आढळून येतात. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खांब नदीकिनारी अनेक लहान मोठी खेडी उदयास आली त्या पैकी एक म्हणजे खडकी हे गाव, म्हणजेच आजचे औरंगाबाद. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेणी व विहार खोदण्यात आले. नंतरच्या शतकामध्ये या गावाचा राजतलक किंवा राजतडाग म्हणूनही उल्लेख आढळतो. चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या यादवांचे राज्य होते. औरंगाबादला जागतिक महत्त्व आहे .औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. औरंगाबादला राजतडाग , खडकी , फातेह्पूर म्हनून सुद्धा ओळखल्या जाते. औरंगाबाद शहरातील दरवाजे पुढील प्रमाणे आहेत. भडकल, मकई गेट, दिल्ली गेट, रोशन गेट, पैठण गेट, रंगीन दरवाजा, कटकट गेट, जाफर गेट, बरापुला गेट, नौबत गेट, हाथी गेट, नूर गेट इ. आहेत. औरंगाबाद मध्ये ५२ दरवाजे व खिडक्या आहेत. सध्या काही दरवाजे हे इतिहास जमा झाले आहेत. एकूण ५२ पैकी २१ दरवाजे व १ खिडकी उभी आहेत.

भूगोल[संपादन]

माहिती हवामान तक्ता - औरंगाबाद
जा फे मा मे जु जु नो डी
 
 
2.8
 
29
12
 
 
2.1
 
32
14
 
 
3.3
 
36
19
 
 
3.5
 
38
22
 
 
24.4
 
39
25
 
 
114.2
 
34
24
 
 
115.6
 
30
22
 
 
119.6
 
29
21
 
 
121.6
 
30
21
 
 
60.8
 
32
19
 
 
10.7
 
30
15
 
 
6.5
 
28
12
तापमान °C मध्येपाउस मात्रा mm मध्ये
दुवा: एमएसएन वेदर

भौगोलिकदृष्ट्या औरंगाबाद अक्षांश उत्तर १९° ५३' ४७" - रेखांश पूर्व ७५° २३' ५४" याठिकाणी वसलेले आहे.हे शहर चारही बाजूनीं टेकड्या आणि डोंगररांगांनी वेढलेले आहे.शहराच्या दक्षिणे कडे सातारा गाव असून तिकडे खंडोबाचे मंदिर आहे. औरंगाबाद या जिल्यात ९ तालुके आहेत.

तापमान: औरंगाबादचे वार्षिक तापमान ९ ते ४० अंश सेल्सीअसदरम्यान असते. शहराला भेट देण्याचा आल्हाददायक काळ हा हिवाळ्यात, ऑक्टोबर ते मार्चदरम्यान आहे [३]

पर्जन्यमान: पडत असलेल्या पावसापैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो साधारणपणे ९.० ते ६९३ मिलीमीटर/महिना हे पावसाचे प्रमाण असते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७२५ मिलीमीटर असते.

साचा:Infobox Weather

नाट्यचळवळ[संपादन]

औरंगाबाद हे अनेक वर्षांपासून नाटकात महत्वाचे स्थान राखून आहे. अजित दळवी यानी अखिल महाराष्ट्रात गाजलेली काही नाटके लिहीली, अलिकडे त्यांनी "कायद्याचे बोला" या चित्रपटाची पटकथा लिहीली. प्रतिक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी अशा कलावंतानी आधी औरंगाबादला सुरूवात केली आणि मग ते मुंबईला चमकले. त्याआधी, कुमार, आलोक चौधरी, विजय दिवाण,त्र्यंबक महाजन अशा अनेक कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धा, कामगार राज्य नाट्य स्पर्धा गाजवलेल्या व अनेकदा जिंकल्याही. 'व-हाड निघालंय लंडनला' या विश्वविक्रमी नाटकाचे सर्वेसर्वा लक्ष्मणराव देशपांडे हेही औरंगाबादचे रहिवासी होते.

अर्थव्यवस्था[संपादन]

गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारतातील व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो. कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रिकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबादच्या जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले. हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टँडर्ड सिल्कमिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादेमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरु झाल्या.

प्रोझोन मॉल औरंगाबाद

उद्योगधंदे[संपादन]

स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, घरातिल वापराच्या ईलेक्ट्रोनिक वस्तु, बिअर आणि व्हिस्की, चामडे, औषधनिर्मिती, रबर, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादेतील प्रमुख उत्पादने होत. निर्लेप , लुपिन लॅबोरेटरी, ग्रिव्ह्स कॉटन लिमिटेड, गरवारे पॉलिस्टर्स ,औरंगाबाद सिल्क मिल्स, केविल सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रकल्प आहेत. शिवाय अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमुहांचे प्रकल्प औरंगाबादेत आहेत. अनेक नवीन उद्योग सद्या उभे राहत आहेत

प्रोझॉन मॉल येथील मोठा बाजार आहे.


राजकीय[संपादन]

खासदार : चंद्रकांत खैरे ( शिवसेना )

आमदार :

महापौर : नंदकुमार घोडेले मनपा आयुक्त":डी.एम.मुगळीकर विभागीय आयुक्त :डॉ. पुरूषोत्तम भापकर हे आधी औरंगाबाद चे मनपा आयुक्त होते

जिल्हाधिकारी : नवल किशोर राम

मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हा परिषद - मधुकर अर्दड औरंगाबाद शहरामध्ये विविध शिक्षण संस्था आहे. नामांकित शिक्षण संस्था असल्यामुळे औरंगाबादेत देशभरातुन त्याचप्रमाणे जगभरातुन विद्यार्थी येतात. शिक्षणासाठी पहिली पसंती औरंगाबादला मिळत आहे.

औरंगाबाद शहरामध्ये आंतरराष्ट्रिय स्तराचे दवाखाने , हॉस्पिटल , मेडिकल रिसर्च सेंटर , इत्यादि मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने सर्व भारतातुन तसेच विदेशातुन वैद्यकिय सेवा घेण्यासाठी रुग्ण येतात.

वाहतूक[संपादन]

हवाई वाहतूक[संपादन]

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चिकलठाणा येथे स्थित आहे. येथून हैदराबाद, दिल्ली, उदैपूर, मुंबई, जयपूर, पुणे आणि नागपूर साठी विमान सेवा उपलब्ध आहे. २००८ पासून हज्ज यात्रा साठी विमान सेवा उपलब्ध झली आहे. सद्यस्थितीत विमानतळाच्या इमारतीचे नवीनीकरण करण्यात आले आहे. विमानतळ औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून १० कि.मी. अंतरावर आहे.

रेल्वे वाहतूक[संपादन]

औरंगाबाद (स्टेशन कोड:AWB) हे दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या सिकंदराबाद-मनमाड विभागात असलेले एक रेल्वे-स्थानक आहे. औरंगाबाद पासून नांदेड, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, शिर्डी, नागपूर, नाशिक, पुणे, अमृतसर, अंबाला, निझामाबाद, कुर्नुल, रेनिगुंटा, विशाखापट्टनम्, इरोडे, मदुराई, भोपाळ, ग्वालियर, वडोदरा, चेन्नई, तिरुपती, रामेश्वरम , अहमदाबाद आणि राजकोटपर्यंत रेल्वे-सेवा उपलब्ध आहे. औरंगाबाद आणि मुंबईला जोडणारी औरंगाबाद जन-शताब्दी एक्स्प्रेस ही शहरापासून निघणारी सर्वात वेगवान रेल्वेगाडी आहे. येथे ब्रॉडगेज आहे.

रस्ते वाहतूक[संपादन]

औरंगाबाद महाराष्ट्र आणि इतर राज्यांत विविध प्रमुख शहरे रस्त्यांनी जोडले आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा शहरातूनच जातो.जालना, पुणे, अहमदनगर, नागपूर, बीड आणि मुंबई ही शहरे रस्त्याने जोडलेली आहेत आणि हा मार्ग सध्या राष्ट्रीय महामार्ग मानक चार लेन रोड मध्ये बदलविल्या जात आहे. नवीन नागपूर-औरंगाबाद-मुंबई एक्सप्रेस हायवे देखील विकसित केला जात आहे. औरंगाबाद येथून शिर्डी येथे जाता येते, रस्ताने हे अंतर 85कि.मी.एवढे आहे.

प्रसिद्ध शिक्षण संस्था[संपादन]

विद्यापीठ[संपादन]

औरंगाबाद शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त संस्थांचा कारभार पाहाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (संशिप्तमध्ये बामु) हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरातील विद्यापीठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. पुढे नामांतरणाच्या लढ्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने मराठवाडा विद्यापीठ याचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे केले.या विद्यापीठाच्या परिसरामध्ये १६व्या शतकातील पहाडसिंग याने बांधलेला सोनेरी महाल आहे. त्यासोबत फुटा मकबरा व काही जुन्या वस्तू आहेत.

वैद्यकीय[संपादन]

 • शासकीय वैद्यकीय महविद्यालय व शासकीय कर्क रोग रुग्णालय औरंगाबाद
 • म.गा.मि. वैद्यकीय महविद्यालय
 • शासकीय दंतविद्या महाविद्यालय
 • भगवान होमियोपेथिक महाविद्यालय
 • फोस्टर डेव्हलपमेंट होमियोपेथिक महाविद्यालय्
 • वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी

कला, वाणिज्य आणि विज्ञान[संपादन]

 • सरस्वती भुवन महविद्यालय
 • देवगिरी महविद्यालय
 • विवेकानंद महविद्यालय
 • पंडित जवाहरलाल नेहरु महाविद्यालय
 • डॊ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय
 • मौलाना आझाद महाविद्यालय
 • वसंतराव नाईक महाविद्यालय
 • छत्रपती शिवाजी महाविद्यालय
 • मिलिंद महाविद्यालय
 • शासकीय महाविद्यालय
 • माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालय
 • महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय
 • मराठवाडा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी

मॅनेजमेन्ट कॉलेज[संपादन]

 • मराठवाडा इन्स्टीटयूट ऑफ मॅनेजमेन्ट & रिसर्च
 • महात्मा गांधी मिशन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
 • राजर्षी शाहू इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
 • देवगिरी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
 • मौलाना आ़झाद इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट


हॉस्पिटल[संपादन]
 • श्रद्धा हास्पिटल
 • कमलनयन बजाज हॉस्पिटल
 • सेठ नंदलाल धुत हॉस्पिटल
 • एम.जि.एम वैद्यकीय महविद्यालय व हॉस्पिटल
 • हेडगेवार हॉस्पिटल
 • माणिक हॉस्पिटल आणि रिसचॅ सेंटर
 • सिंघमा हॉस्पिटल
 • दुनाखे हॉस्पिटल
 • सिटी केयर हॉस्पिटल
 • सरकारी कैंसर हॉस्पिटल
 • मॉस्क हॉस्पिटल
 • लिलावती हॉस्पिटल
 • गोल्डन केयर हॉस्पिटल
 • रोपळेकर हॉस्पिटल
 • आधार क्रिटिकल हॉस्पिटल
 • ब्रैन हॉस्पिटल
 • चौबे हॉस्पिटल
 • साई युरोलॉजी हॉस्पिटल
 • साई हॉस्पिटल
 • डागा हॉस्पिटल
 • न्यु लाईफ हॉस्पिटल
 • पाटिल हॉस्पिटल
 • डॉ.काळबांडे हॉस्पिटल
 • प्यासिफिक हॉस्पिटल
 • आयकान हॉस्पिटल
 • शासकीय वैदकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी
 • औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालय चिकलठाणा औरंगाबाद
 • शासकीय कर्करोग रुग्णालय औरंगाबाद

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

बीबी का मकबरा

¥1 - इथे अंदाजे १५०० सुफ़ी संताना दफनविण्यात आलेले आहे[ संदर्भ हवा ] देवगड - दत्ताचे देवस्थान औरंगाबाद लेणी बुद्ध लेणी ¥2 - मुघल शासनकाळात औरंगाबादला ४ मुख्य व ९ इतर दरवाजे होते. यातील पैठण गेट आणि रोशन गेट प्रसिद्ध आहेत

 • प्रोझोन मॉल
 • डी मार्ट मॉल
 • रिलायन्स मॉल

हॉस्पिटल घाटी - मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रूग्णालय. याठिकाणी विदर्भ,खानदेशातील रूग्णही उपचारासाठी येतात. तसेच अद्यावत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार पद्धती केली जाते.

दरवाजे[संपादन]


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


भारतात इतर अनेक मध्ययुगीन शहरांपासून औरंगाबादला उभे राहिलेल्या गोष्टींपैकी 52 गोष्टी "गेट्स" आहेत, त्यापैकी प्रत्येक स्थानिक इतिहासाचा किंवा त्याच्याशी संबंध असलेल्या व्यक्ती होत्या. औरंगाबादला "गेट्स ऑफ सिटी" म्हणून ओळखले जाते.

52 पैकी केवळ 4 मुख्य आणि 9 इतर गेट टिकून आहेत, सर्वात प्रसिद्ध, सर्वात जुने आणि सर्वात मोठ्या निजाम पॅलेस ऑफ निजाम जवळ भडकल गेट आहे.

संदर्भ[संपादन]

{{ दैनिक लोकमत दिनांक ७ जानेवारी २०१७ आपलं औरंगाबाद पुरवणी {{ https://mr.wikipedia.org/wiki/डॉ._बाबासाहेब_आंबेडकर_मराठवाडा_विद्यापीठ

बाह्य दुवे[संपादन]

उत्तर: जळगाव
पश्चिम: अहमदनगर औरंगाबाद पूर्व: जालना
दक्षिण: बीड

'हार्ट ऑफ द सिटी 'म्हणून 'निराला बाजार 'ओळखले जाते .