या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिश्चन धर्म (इंग्रजी भाषा:-Christianity (/krɪstʃiˈænɪti/)) हा येशूच्या जीवनावर आणि शिकवणींवर आधारित अब्राहमिक एकेश्वरवादीधर्म आहे. सुमारे २.४ अब्ज अनुयायांसह हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात व्यापक धर्म आहे, ज्यात जगातील लोकसंख्येच्या सुमारे ३१.२% आहेत.[१] त्याचे अनुयायी, ख्रिश्चन वा ख्रिस्ती म्हणून ओळखले जातात. हा धर्म १५७ देश आणि प्रदेशांमध्ये बहुसंख्य आहे.
ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे, ज्याच्या मसिहा म्हणून येण्याची भविष्यवाणी हिब्रू बायबलमध्ये करण्यात आली होती (ख्रिश्चन धर्मात जुना करार म्हणतात) आणि नवीन करारामध्ये कालबद्ध आहे.
ख्रिस्ती धर्म त्याच्या पाश्चात्य आणि पूर्वेकडील शाखांमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे, आणि सैद्धांतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे आणि तारणाचे स्वरूप, ecclesiology, ordination आणि Christology. विविध ख्रिश्चन संप्रदायांचे पंथ सामान्यतः येशूला देवाचा पुत्र म्हणून समान मानतात - लोगोने अवतार घेतला - ज्याने सेवा केली, दुःख सहन केले आणि वधस्तंभावर मरण पावले, परंतु मानवजातीच्या तारणासाठी मेलेल्यांतून उठला; आणि गॉस्पेल म्हणून संदर्भित, ज्याचा अर्थ "चांगली बातमी" आहे. मॅथ्यू, मार्क, ल्यूक आणि जॉनच्या चार प्रामाणिक शुभवर्तमानांमध्ये येशूच्या जीवनाचे आणि शिकवणींचे वर्णन आहे, जुन्या करारासह गॉस्पेलची आदरणीय पार्श्वभूमी आहे.[२]
हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. जवळपास २.६ अब्ज लोक ख्रिस्ती धर्माचे पालन करतात. पॅलेस्टाईन (सध्याचा इस्रायल देश) येथील बेथलहेम येथे ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ झाला. येशू ख्रिस्त हा या धर्माचा संस्थापक मानला जातो. ख्रिस्तपूर्व ४ ते ६ च्या दरम्यान येशूचा जन्म बेथलेहम या गावी झाला. ख्रिस्ती शकारंभी बलाढ्य रोमन साम्राज्यअटलांटिक महासागरापासूनतुर्कस्तान पर्यंत व जर्मन समुद्रापासून सहारा वाळवंटापर्यंत पर्यंत पसरले होते. पॅलेस्टाईन हा या रोमन साम्राज्यातील एक सुभा होता. योग्य वेळ आली तेव्हा गालील प्रांतातील बेथलेहम या गावी येशूचा जन्म झाला. त्या वेळी पॅलेस्टाईन देशावर रोमन सत्ता अधिकार गाजवीत होती. सम्राट ऑगस्टस हा या साम्राज्याचा सम्राट होता. त्याने गालील प्रांताचा मांडलिक राजा म्हणून हेरोद राजाला नेमले होते. याच्याच अमदानीत येशूचा जन्म झाला. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्त यांनी केली हा धर्म जगभर पसरलेला आहे येशू ख्रिस्तांच्या बारा शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतातीलकेरळमध्ये आले. त्यांनी थ्रिसुर जिल्ह्यातील पलयेर येथे इसवी सन ५२ मध्ये चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार नुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तीमान आहे येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते. असे मानले जाते आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्म सांगितले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनाच स्थळाला चर्च असे म्हणतात.
येशू (मूळ हिब्रू शब्द यहोशवा - यहोवा माझे तारण आहे) या हिब्रू नावाचा अर्थ तारणारा असा आहे. तर ख्रिस्त हा शब्द ख्रिस्तोस या ग्रीक शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ अभिषिक्त केलेला असा होतो. ख्रिस्तोस हा शब्द मसीहा (म्हणजे तारणारा) या हिब्रू शब्दाचे ग्रीक भाषेतील रूपांतर आहे. येशू धर्माने यहुदी होता. वयाच्या २७ व्या वर्षी त्याने आपल्या शिकवणुकीला प्रारंभ केला. जवळपास तीन वर्ष त्याने आपली शिकवण संपूर्ण गालील प्रांतात व आजूबाजूच्या परिसरात प्रसारित केली. त्याने बारा प्रेषितांची निवड करून त्यांना आपले कार्य पुढे चालविण्यास प्रोत्साहन दिले. यहुदी धर्मानुसार (जुना करार) पापी मानवाच्या तारणासाठी परमेश्वराने तारणारा (मूळ हिब्रू शब्द मसीहा) पाठविण्याचे अभिवचन दिले होते. जुन्या करारात या मसीहाबद्दल अनेक भविष्ये वर्तविली गेली होती. येशू हाच तारणारा (मसीहा) आहे अशी ख्रिस्ताच्या शिष्यांची खात्री झाली होती. वयाच्या ३३ व्या वर्षी यहुदी धर्माधिकाऱ्यांनी त्याच्यावर धर्मद्रोहाचा व राष्ट्रद्रोहाचा आरोप करून तत्कालीन रोमन सत्ताधीशांच्या करवी त्याला क्रुसावर खिळवून ठार केले. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. त्याने आपल्या अनेक प्रेषितांना दर्शने दिली. व त्याची शिकवण जगभर प्रसारित करण्याची आज्ञा दिली. त्यांनंतर तो स्वर्गात गेला. असा ख्रिस्ती धर्मीयांचा विश्वास आहे. त्याच्या आज्ञेनुसार त्याच्या प्रेषितांनी ख्रिस्ती धर्माचा जगभर प्रसार केला. बायबल (जुना व नवा करार) हा ख्रिस्ती धर्माचा धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात मोठा धार्मिक समुदाय आहे. ख्रिस्ती धर्मात तीन मुख्य पंथ आहेत. १. कॅथोलिक, २ ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, ३. प्रोटेस्टंट पंथ. या पंथांतही (विशेषतः प्रोटेस्टंट पंथात) प्रेस्बिटेरियन, कॅल्व्हिनिस्ट आदी अनेक उपपंथ आढळतात. आज जगभरामध्ये ख्रिस्ती धर्मीय लोकांची संख्या खूप मोठी आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतातही ख्रिश्चन मिशनरी यांनी मोठ्या प्रमाणात या धर्माचा प्रसार आणि प्रचार भारतामध्ये केला त्यातून भारतामध्ये हा धर्म मोठ्या प्रमाणात वाढला आज भारतामध्ये ख्रिस्ती धर्मीय लोकांची संख्या ही विशेष आहे मानवता धर्माची शिकवण याही धर्मामध्ये दिली जाते [ संदर्भ हवा ]
ख्रिस्ती धर्मपंथ : ख्रिस्ती धर्मात मुखत्वे तीन धर्मपंथ आढळून येतात. १. रोमन कॅथोलिक २. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स,३. प्रोटेस्टंट पंथ. रोमन कॅथोलिक पंथ हा धर्मातील कर्मठ परंपराचे जतन करतो. रोमन कॅथोलिक पंथ रोमच्या पोपची धार्मिक सत्ता मान्य करते. हा ख्रिस्ती धर्मातील सुधारणावादी विचारांचे समर्थन करतो. रोमन कॅथोलिक पंथ आणि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ यांच्याशिकवणुकीत व विचारात विशेष फरक नाही. फक्त ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ हा रोमच्या पोपची सत्ता मान्य करीत नाही तर त्याऐवजी कॉनस्तंटटीनोपलची सत्ता सर्वोच्च मानतात. या पंथांच्या धार्मिक श्रद्धा, धार्मिक विधी या बाबतीत बरीच मतभिन्नता असली तरी येशू ख्रिस्ताबाबत असलेले तीन घटक सर्वांनाच मान्य आहेत. ते तीन घटक खालीलप्रमाणे :
१. ख्रिस्ताचा जीवन वृत्तांत : येशू ख्रिस्ताच्या जीवन व कार्यासंबंधी सर्वे घटनांचे संकलन करणारे वृत्तांत (चार शुभवर्तमाने - Four Gospels)
२. धर्मसिद्धान्त : येशु ख्रिस्त ही एकमेव अद्वितीय व्यक्ती व परमेश्वराचा पुत्र असून त्याच्या द्वारेच मानवाला तारणप्राप्ती होऊ शकते. तो देव व मानव यांच्यातील एकमेव मध्यस्थ आहे.
३. मानवी जीवन : परमेश्वराबद्दल व आपल्या सहकाऱ्याबद्दल प्रेम बाळगून जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती मनुष्य प्रयत्न करतो, म्हणजेच ख्रिस्ताच्या आदर्श जीवनाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती व्यक्ती प्रयत्न करते.[ संदर्भ हवा ]
ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो ईश्वर असून मनुष्य झाला, मानवतेचा रक्षक, जो तारणारा आहे, त्यामुळे ख्रिस्ती लोक येशूला ख्रिस्त किंवा मसीहा म्हणतात.
ज्याची हिब्रू बायबल (यहुदी लोकांचे धर्मपुस्तक व ख्रिस्ती लोकांचे जुना करार) मध्ये भविष्यवाणी केली होती, तोच हा येशू मसीहा आहे असा ख्रिस्ती लोकांचा विश्वास आहे.[३]
२०११ च्या जनगणनेनुसार भारतात ख्रिश्चन धर्म हा तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. ख्रिस्तीधर्मीय भारताच्या लोकसंख्येच्या २.३ टक्के आहेत. भारतात या धर्माचे आगमन संत थॉमस याच्या येण्यानंतर झाले. भारताच्या ४ राज्यांत ख्रिश्चन हे बहुसंख्याक आहेत.[४]
इस्लाम, ख्रिस्ती आणि ज्यू या तिन्ही धर्माचा भारतीय उपखंडातील प्रवेश दक्षिण भारतातील केरळ प्रांतातून झाला. येशू ख्रिस्ताच्या बारा प्रत्यक्ष शिष्यांपकी सेंट थॉमस ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने केरळच्या किनारपट्टीवरील मुझिरिस म्हणजे सध्याचे कोडुंगलूर येथे इ.स. ५२ मध्ये आला. त्याच्या तिथे येण्यापूर्वी काही ज्यू लोक आधीच त्या भागात स्थायिक झाले होते. थॉमसने त्या भागातील पालायार, कोडुंगलूरवगरे आठ ठिकाणी चर्च स्थापन करून ख्रिस्ती धर्मप्रसाराची केंद्रे सुरू केली. इ.स. ७२ मध्ये चेन्नईजवळच्या सध्याच्या सेंट थॉमस माऊंट येथे त्याची हत्या झाली.
सेंट थॉमसने ख्रिस्ती धर्माची दीक्षा (बाप्तिस्मा) दिलेल्या लोकांची संख्या वाढत गेली. सेंट थॉमस हा सीरियन ख्रिस्ती धर्मपीठाचा धर्मोपदेशक असल्यामुळे त्याने दीक्षा दिलेल्या ख्रिस्ती धर्मीयांना ‘सीरियन ख्रिश्चन्स’, ‘सेंट थॉमस ख्रिश्चन्स’ किंवा ‘नसरानी ख्रिश्चन्स’ असे संबोधण्यात येते. सीरियन ख्रिश्चन पंथीयांची संख्या अधिकतर केरळातच आढळते. सीरियन ख्रिश्चन धर्मपंथाचे हे भारतातले ख्रिश्चन या परकीय धर्माचे पहिले अनुयायी होते. पुढे मध्यपूर्वेतल्या आणि आफ्रिकन देशांमधून आलेले ख्रिश्चन लोक आणि धर्मांतर केलेले ज्यू धर्मीय यांनीही सीरियन धर्मपंथाचा स्वीकार केला. केरळातल्या या सीरियन ख्रिस्ती लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या जीवनशैलीवर तिथल्या स्थानिक हिंदू परंपरांचा पडलेला प्रभाव. हिंदूंच्या काही स्थानिक परंपरा पाळणाऱ्या या सीरियन ख्रिश्चनांचे सर्व व्यवहार मल्याळी भाषेतच चालतात. मल्याळी भाषेतच अनुवादित केलेले धर्मग्रंथ येथे वाचले जातात. या समाजातील अनेक लोकांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने समाजाचे नाव मोठे केले आहे. भूतपूर्व केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँटनी, भारतातील उच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधीश अॅना चांदी, प्रसिद्ध मल्याळी कवी के. व्ही. सायमन, ख्रिस्ती धर्मोपदेशक साधू कोचुंजु उपदेशी हे सर्व सीरियन ख्रिश्चन होत.[५]