आसाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?आसाम
भारत
—  राज्य  —
गुणक: 26°09′N 91°46′E / 26.15°N 91.77°E / 26.15; 91.77
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ७८,४३८ चौ. किमी
राजधानी दिसपूर
मोठे शहर गुवाहाटी
जिल्हे २७
लोकसंख्या
घनता
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
२,६६,५५,५२८ (१४ वे) (२००१)
• ३४०/किमी
त्रुटि: "64.28%" अयोग्य अंक आहे %
त्रुटि: "71.93%" अयोग्य अंक आहे %
त्रुटि: "56.03%" अयोग्य अंक आहे %
भाषा असमीया, बंगाली, बोडो, मिशिंग, कर्बी
राज्यपाल जानकी बल्लभ पटनाईक
मुख्यमंत्री तरूण गोगोई
स्थापित १५ ऑगस्ट इ.स. १९४७
विधानसभा (जागा) आसाम विधानसभा (126)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AS
संकेतस्थळ: आसाम संकेतस्थळ

गुणक: 26°09′N 91°46′E / 26.15°N 91.77°E / 26.15; 91.77

आसाम ईशान्य भारततील एक महत्वाचे व सर्वात मोठे राज्य आहे. अासामच्या उत्तरेला भूतानअरूणाचल प्रदेश आहे. पूर्वेला नागालँडमणिपूर ही राज्य आहेत. तर दक्षिणेला मेघालय, त्रिपूरामिझोरम ही राज्य आहेत. ईशान्य भारतातील सात राज्यांपैकी आसाम सगळ्यात मोठे राज्य आहे. आसाम ची लोकसंख्या ३,११,६९,२७२ एवढी आहे. असमीया ही आसामची प्रमुख भाषा आहे. आसामची साक्षरता ७३.१८ टक्के एवढी आहे. तांदूळमोहरी ही येथील प्रमुख पिके आहेत. बिहू नृत्य येथील लोकप्रिय नृत्य आहे. दिसपूर ही आसामची राजधानी तर गुवाहाटी सर्वात मोठे शहर आहे.

नावाची उत्पत्ती[संपादन]

भूगोल[संपादन]

हिमालयाच्या पायथ्याशी असलेले हे राज्य ब्रह्मपुत्रबराक नदीच्या खोर्‍यांत आहे. तसेच कर्बी अँगलाँगउत्तर कचर टेकड्यांचाही या राज्यात समावेश होतो. आसामचे क्षेत्रफळ ७८,४३८ कि.मी. आहे. हा विस्तार जवळजवळ आयर्लंड देशाइतका आहे.

जिल्हे[संपादन]

यावरील विस्तृत लेख येथे आहे.

आसाम राज्यात २३ जिल्हे आहेत.

इतिहास[संपादन]

प्राचीन आसाम[संपादन]

मध्यकालीन आसाम[संपादन]

आधुनिक आसाम[संपादन]

भाषा[संपादन]

असमीया ही आसाम मधील प्रमुख भाषा आहे.

संस्कृती[संपादन]

बिहू[संपादन]

रंगिल्या बिहू उत्सवाला आपण जर रंगाचा उत्स्व म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही सात दिवसांचा हा बिहु उत्सव अनेक विषयांनी पुरेपुर असा असतो. शेतकर्यात एक म्हण आहे. 'जार नाई गोरु सि सबातोके खोरु' याचा अर्थ ज्याच्याजवळ गोधन नाही तो सगळ्यात दरिद्री. म्हणुनच बिहूचा संबंध 'गोरु बिहू' पासुन सुरु होतो. आसामी भाषेत गाय-बैलाला गोरु म्हटले जाते. चैत्र संक्रांतीच्या दिवशी गायीं-बैलांना जवळच्या तलावावर किंवा नदीवर नेऊन हळद, तेल, उडिदाचे पीठ लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यानंतर त्या गाय-बैलांची पुजा केली जाते. केळीच्या पानावर निरनिराळी पक्वान्ने तयार करुन नैवेद्य दाखवून त्यांना खाऊ घातले जाते आणि त्यांच्या भल्यासाठी परमेश्वराची प्रार्थना केली जाते. त्यांच्या जुन्या दोर्या बदलुन नवीन दोर्या लावल्या जातात्. त्यांच्या गळ्यात कंठा घातला जातो.

रंगाली बिहुच्या दुसर्या दिवशी 'मानुह बिहू' अथवा 'चेनही बिहू' अर्थात मानव बिहु अथवा स्नेही बिहुचा उत्सव करतात. यासाठी स्त्रिया 'जोहा, बडेअ, मानिक मधुरी(सर्व असामी नावे) इत्यादी तांदळाचे पक्वान्न तयार करतात. हे पीठा (उंडे) तांदुळ कुटुन त्या पिठापासुन गोड व तिखट चवीचे केलेले असतात. या दिवशी वयस्कर लोकांचा आशीर्वाद घेतला जातो.नंतर बिहूचे वाण देण्याचा कार्यक्रम होतो. बिहू वाण हे केवळ वस्त्र नाही तर हे आसामी लोकांच्या सदभावनेचे द्योतक मानतात्. बिहु वाणाला सदभावनेचे कवच समजून वर्षभर सुरक्षित ठेवले जाते. मुली बिहूच्या निमित्तने आपल्या प्रियकराला भेट स्वरुपात बिहूवाण देतात. भावाला, बहिणीला, पत्नीला हे बिहुवाण एखाद्या वेळी देता आले नाही तर त्यांना कशी मानसिक रुखरुख लागून राहते, ते दु:ख आसामीच जाणोत.

मानुह बिहूच्या दिवशी गडगडाटासह पाऊस झाला की, आसामी लोक पुढील वर्षी पीक-पाणी चांगले होईल असे मानतात. बिहूउत्सवाचा महत्वपुर्ण भाग हुसोरी गीते हा असतो. हुसोरी गीताचे दोन भाग असतात. पहिल्या भागाला 'बिहूनाम' म्हणतात आणि दुसर्या भागाला 'हुसोरी कीर्तन' म्हणतात बिहूनामाची सुरुवात करण्यापुर्वी गुरुजनांची आणि वडिलधर्यांची प्रशंसा करणारी गाणी गायली जातात.

बिहूच्या सहाव्या दिवशी तरुणी हाता-पायांवर मेंदी काढुन घेतात. सातव्या दिवशी सोंगट्यांचा व कवड्यांचा खेळ म्हातारे व वयस्कर स्त्रियाच खेळतात. कवड्यांचा संबंध पुनरुत्पत्तीशी आहे. आसामातील लोकांचा बिहू उत्स्व वर्षातुन तीन वेळेला येतो. वैशाखातील 'रंगाली' बिहुपासुन सुरु होऊन कार्तिक कंगाली बिहू आणि माघ बिहु(भोगाली बिहु) च्या उत्सवाचा कार्यक्रम पुरा करुन हे बिहूचे पर्व संपते. रंगाली बिहू म्हणजे मौज मजा, कंगाली बिहू म्हणजे गरिबीचे द्योतक तर भोगाली बिहू म्हणजे भोग विलास.असा आहे.

प्रत्येक वर्षी आषाढ, श्रावण, भाद्रपद महिन्यात पुरामुळे होणारे नुकसान हे आसामच्या लोकांच्या पाचवीला पुजलेले असते. कार्तिक महिन्यानंतर आसामि लोक थोडे स्थिरस्थावर होऊ लागतात. परंतु त्यावेळी शेतकर्यांची धान्य कोठारे रिकामी होउ लागतात म्हणुन त्या बिहूला कंगाली बिहू म्हटले जाते.

दुर्गा पुजा[संपादन]

संगीत[संपादन]

अर्थव्यवस्था[संपादन]

चहा[संपादन]

तेल[संपादन]

आसामच्या समस्या[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.