बिपिनचंद्र पाल
British Indian Bengali academic and politician (1858–1932) | |
माध्यमे अपभारण करा | |
![]() | |
स्थानिक भाषेतील नाव | বিপিনচন্দ্র পাল |
---|---|
जन्म तारीख | नोव्हेंबर ७, इ.स. १८५८ Habiganj District |
मृत्यू तारीख | मे २०, इ.स. १९३२ कोलकाता |
नागरिकत्व | |
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय | |
नियोक्ता | |
राजकीय पक्षाचा सभासद | |
पद |
|
मातृभाषा | |
![]() | |
![]() |
बिपिनचंद्र पाल (७ नोव्हेंबर, १८५८ - २० मे , १९३२) हे लाल-बाल-पाल त्रयीतील एक स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर, १८५८ रोजी पाईल (जि. सिलहेट- ढाका) या गावी झाला. त्याचे वडील रामचंद्रपाल हे पेशकार असून ते प्रखर देशभक्त व विशुद्ध चरित्राचे होते. ते स्वतः सनातनी असून मुलांनी पाश्चिमात्य शिक्षण शिकावे असे त्यांना वाटत होते. १८७९ मध्ये शिक्षण पूर्ण होताच काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली.
बिपिनचंद्र पाल यांचा जन्म उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात पॉइल (जिल्हा सिल्हेट) या गावी झाला. सध्या हा प्रदेश बांगलादेशात अंतर्भूत होतो. बिपिनचंद्र यांचे एकूण आयुष्य कष्टमय होते. विद्यार्थीदशेतच त्यांनी विपूल वाचन केले. ब्राम्होसमाजाचे केशवचंद्र सेन यांच्या विचारांची छाप त्यांच्यावर पडली. याशिवाय पी. के. रॉय, आनंदमोहन बोस, द्वारकानाथ गांगुली वगैरे विद्वानांचा प्रभाव त्यांच्यावर होता. सुरुवातीस त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. नंतर त्यांनी 'वंदे मातरम्' हे दैनिक सुरू केले. बिपिनचंद्र हे एक् तत्त्वचिंतक होते. त्यांना देशाची सर्वांगीण तयारी झाल्याशिवाय स्वातंत्र्य नको होते. त्यांची राष्ट्रीयत्वाची कल्पना धर्मभावनांशी निगडित होती. ते होमरुल लीगचे सभासद होते, तसेच काँग्रेसचे निष्ठावन कार्यकर्ते होते. बिपिनचंद्रांनी अनेक वृत्तपत्रे काढली. यातून त्यांनी आपले विविध विषयांवरील विचार मांडले. याशिवाय त्यांनी तत्कालीन थोर व्यक्तींचे चरित्रे लिहिली. पहाडी आवाजाचे वक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. लाल - बाल- पाल या त्रयीने वंगभंग, स्वदेशी व बहिष्कराचे प्रचंड आंदोलन करून जनजागृती केली.
लाल-बाल-पाल त्रयीतील बंगालमधील सर्वश्रेष्ठ देशभक्त होते. त्याच्या कार्याचा गौरव करताना बाबू अरविंदो (अरविंद घोष) यांनी म्हणले आहे की, बिपीन चंद्र पाल हे राष्ट्रवादाचे सर्वात समर्थ प्रेषित व या देशातील सर्वोत्तम विचारवंत होते.[१][२]
बंदे मातरम्
[संपादन]बिपिनचंद्र पाल हे बंदे मातरम् या नियतकालिकात ६ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर १९०६ या कालावधीत मुख्य संपादक म्हणून कार्यरत होते. १२ ऑक्टोबर पासून ते श्रीअरविंद यांच्याबरोबरीने सह-संपादक या नात्याने काम पाहू लागले. नोव्हेंबर १९०६ ते एप्रिल १९०८ या कालावधीत त्यांचा बंदे मातरम् शी असलेला संपर्क संपुष्टात आला. [२]
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- पाल बिपिनचंद्र Archived 2023-05-20 at the Wayback Machine., (मराठी विश्वकोश)