विद्यापीठ
विद्यापीठ ही उच्च शिक्षण व संशोधनासाठीची संस्था असते. विद्यार्थ्यांना विविध विषयातील पदवी प्रदान करण्याचे अधिकार विद्यापीठाकडे असतात.
कुलपती हे पद विद्दयापीठ कार्यकारिणीतले सर्वोच्च पद असून कुलगुरू हा विद्यापीठाचा कार्यकारी प्रमुख असतो.
भारतामध्ये कोणत्याही राज्याचा राज्यपाल हा त्या राज्यातील सगळ्या राज्य विद्यापीठांचा आसनाधिष्ठीत कुलपती असतो.
विद्यापीठा कडून उच्च शिक्षणा साठी प्रदान केल्या जाणाऱ्या मुख्य पदव्या:
- विद्यालंकार (Doctor of Literature or Doctor Of Letters)
- विद्यावाचस्पती (Ph. D.)
- विद्यानिष्णात (M. Phil.)
- विद्यापारंगत (Master Of Arts)
- विद्याप्रवीण (Bachelor Of Arts)
भारतातले नालंदा (बिहार) हे जगातल्या अतिप्राचीन विद्यापीठांपैकी एक आहे. सोलापूर विद्यापीठ हे 2004 साले अस्तित्वात आले. सोलापूर विद्यापीठ एका जिल्ह्यासाठी असून सध्या शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती करत आहे.
भारताच्या विदयापीठांचे प्रकार
[संपादन]- राज्य विदयापीठ
- केंद्रीय विदयापीठ
- अभिमत विदयापीठ
- खाजगी विदयापीठ
राज्य विदयापीठ
[संपादन]हे विदयापीठ राज्य सरकारद्वारे नियंत्रित केले जाते.
उदा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
केंद्रीय विदयापीठ
[संपादन]हे विदयापीठ केंद्र सरकारद्वारे नियंत्रित केले जाते.
उदा. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय
अभिमत विदयापीठ
[संपादन]पुर्वी एखाद्या विदयापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयास विदयापीठाचा दर्जा दिल्यास त्या विदयापीठास अभिमत विदयापीठ असे म्हणतात.
उदा. डी. वाय. पाटील विद्यापीठ, भारती विद्यापीठ. टिळक विद्यापीठ
अभिजित कदम अभिमत विद्यापीठ
खाजगी विदयापीठ
[संपादन]उदा. अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ
मुक्त विद्यापीठ
[संपादन]मुक्त विद्यापीठ म्हणजे विद्यार्थ्यांना सोईनुसार पदवी शिक्षण घेण्याची सुविधा असलेले विद्यापीठ. मुक्त शिक्षणाची चळवळ खऱ्या अर्थाने १९८२ मध्ये हैदराबाद येथे स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून झाली. आता अशी एकूण १० मुक्त विद्यापीठे आज भारतात कार्यरत आहेत.
ती अशी :-
- इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ (१९८५)
- कर्नाटक स्टेट मुक्त विद्यापीठ, म्हैसूर (१९९६)
- कोटा मुक्त विद्यापीठ, राजस्थान (१९८७)
- उत्तर प्रदेश राजर्षी टंडन मुक्त विद्यापीठ, अलाहाबाद (१९९८)
- नालंदा मुक्त विद्यापीठ, पाटणा (१९८७)
- नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ, कोलकाता (१९९७)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, अहमदाबाद (१९९४); हैदराबाद (१९८२)
- मध्य प्रदेश भोज मुक्त विद्यापीठ, भोपाळ (१९९१)
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (१९८९)
स्वायत्त विद्यापीठ
[संपादन]स्वतःची घटना, अभ्यासक्रम व नियमावली असणाऱ्या, तसेच राज्य वा केंद्र सरकारच्या अधिकार कक्षेबाहेरील विद्यापीठांना स्वायत्त विद्यापीठ म्हणले जाते. उदा. मेक्सिकोचे "National Autonomous University"
भारतात 'स्वायत्त विद्यापीठ' असा प्रकार अस्तित्वात नाही, पण 'स्वायत्त महाविद्यालय' या प्रकारात काही महाविद्यालये आहेत.