रामजी सकपाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामजी मालोजी सकपाळ
Subhedar Ramji Maloji Sakpal (1838 - 1913) was the father of Dr. Babasaheb Ambedkar who was a Subedar – Major in army.png
जन्म रामजी मालोजी सकपाळ
नोव्हेंबर १४,‌ इ.स. १८४८
पुणे, महाराष्ट्र
मृत्यू फेब्रुवारी २, इ.स. १९१३
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा सैनिक, सैनिकी शिक्षक
मूळ गाव आंबडवे
पदवी हुद्दा सुभेदार
जोडीदार भीमाबाई आंबेडकर
जिजाबाई आंबेडकर
अपत्ये आनंद, भीमराव, बळराम, गंगा, मंजूळा, तुळसा
वडील मालोजी सकपाळ


रामजी मालोजी सकपाळ (इ.स. १८४८ - इ.स. १९१३), रामजी आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्येसुभेदार’ पदावर कार्यरत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रामजी मालोजी आंबेडकरांनी भीमरावांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या. भीमरावाने उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामितुन बाहेर काढावे ही रामजी आंबेडकरांची इच्छा होती.[१]

जीवन[संपादन]

रामजी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. रामजींचे वडील मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते.[२] मालोजीरावांना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतर मुलगीचा मिराबाई यांचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजीरावांचे चौथे अपत्य होते.[२] मालोजीरावांचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[२] शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षाचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते.[३] रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते. ते रोज ज्ञानेश्वरी वाचत, सकाळी स्त्रोते व भुपाळ्याही म्हणत. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरू झाले व त्यांनी इंग्रजी उत्तमरित्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या (मॅट्रिकच्या) परीक्षेत उत्तीर्ण झाले.[३] मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुचली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच 'नॉर्मल स्कूल'मध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली.[४] रामजींना उत्तम शिक्षण बनवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यास पुण्याच्या सैनिक शाळेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राजसत्तेच्या सैनिक शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले व या पदावर ते चौदा वर्ष राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात 'सुभेदार' पदाचीही बढती मिळाली.[५] रामजी व भीमाबाई या दांपत्यांना सन १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[६]

रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[६] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (सध्या डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[६] रामजींनी मराठीइंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://prahaar.in/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0/[permanent dead link]
  2. ^ a b c गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३४ व ३५. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ a b c गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३५. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)