गणेश प्रभाकर प्रधान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गणेश प्रभाकर प्रधान

गणेश प्रभाकर प्रधान (ऑगस्ट २६, इ.स. १९२२ - मे २९, इ.स. २०१०) हे समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते.

जीवन[संपादन]

पुण्यात विद्यार्थिदशेतच ते ना. ग. गोरेएस.एम. जोश्यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. त्यांनी इ.स. १९४२च्या भारत छोडो आंदोलनातही सक्रिय भाग घेतला होता. त्यांना त्यासाठी १३ महिने येरवड्याच्या तुरुंगात जावे लागले. त्यांनी समाजवादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्र सेवादलासाठी काम केले. पुढे १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात ते पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरुंगात होते.[१]
ग.प्र. प्रधान १९४५ पासुन पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयांत इंग्रजीचे प्राध्यापक होते.

राजकारण[संपादन]

ते प्रजासमाजवादी पक्षातर्फे १९६६ साली पदवीधर मतदार संघातून निवडून आले. पुढे (?? ते ??) त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद भूषविले.

प्रकाशित साहित्य[संपादन]

मराठी[संपादन]

 • 'लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक
 • आगरकर लेखसंग्रह
 • महाराष्ट्राचे शिल्पकार - ना. ग. गोरे
 • साता उत्तरांची कहाणी[२]
 • सत्याग्रही गांधीजी
 • माझी वाटचाल
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत

इंग्रजी[संपादन]

 • लोकमान्य टिळक – अ बायोग्राफी
 • इंडियाज फ़्रीडम स्ट्रगल: ऍन एपिक ऑफ सॅक्रिफाइस अँड सफरिंग
 • लेटर टु टॉलस्टॉय
 • परस्यूट ऑफ आयडियल्स

पुरस्कार[संपादन]

 • राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार (२००९) 'लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक' साठी

संकीर्ण[संपादन]

 • समीर शिपूरकर (अवकाश निर्मिती) यांनी प्रधानांच्या जीवनकार्य आणि समाजसेवेचा परिचय देणार्‍या लघुपटाची निर्मिती केली आहे.[३]

संदर्भ[संपादन]

 1. ^ http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=lk9vwpaaeMNbuN9ET0uzxuRa4E7PtNEdgqqa1BiGd7kG2o4NkzprJg==[मृत दुवा]
 2. ^ संजय वझरेकर (२६ ऑगस्ट २०१३). "नवनीत: आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता (मुंबई). १९ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. 
 3. ^ http://www.indianexpress.com/news/documentary-film-on-the-life-of-socialist-le/457908/


बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.