सवर्ण
Appearance
सवर्ण ही उच्च जातीच्या हिंदू व्यक्तींसाठी वापरली गेलेली संज्ञा आहे. सवर्ण म्हणजे उच्च वर्ण. हिंदू धर्मातील ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णातील हिंदूंना सवर्ण संबोधले जाते. धार्मिक व सामाजिक दृष्ट्या विचार केल्यास SC ST सोडून सर्व स्पृश्य जाति सवर्ण वर्गात येतात पण अनेक समाजांनी आरक्षणाची मागणी केल्याने आता कायदेशीर रित्या फक्त ब्राह्मण, राजपूत, कायस्थ, हेच समाज सवर्ण[Open] वर्गात मोडतात. भारतीय संविधानाने यांना ‘खूला प्रवर्ग’ (ओपन कॅटेगरी’ ही संज्ञा दिली आहे. संबंध भारतीत १५% लोकसंख्या ही सवर्ण वा खूल्या प्रवर्गात मोडणारी आहे. उर्वरित ८५% लोकसंख्या ही इतर मागास वर्ग (ओबीसी), अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यक प्रवर्गात मोडणारी आहे.