दीक्षाभूमी (चंद्रपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेसुद्धा पाहा: दीक्षाभूमी


दीक्षाभूमी हे पवित्र बौद्ध स्थळ महाराष्ट्रातील चंद्रपूर शहरात आहे. नागपूरच्या दीक्षाभूमी नंतर ही दीक्षाभूमी नवयानी बौद्धांचे सर्वात महत्त्वाचे स्थळ आहे. नागपूरला १४ व १५ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे ५ लक्ष व २ लक्ष अनुयायांना दीक्षा दिल्यावर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तिसऱ्यांदा १६ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी आपल्या सुमारे ३,००,००० अनुयायांसह नवयान बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, त्यामुळे या भूमीलाही ‘दीक्षाभूमी’ म्हटले जाते.

बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी त्यांच्या नावाने महाविद्यालय सुरू आहे. आणि काही कालावधी नंतर या दिक्षाभूमीवर एक विशाल स्तूप उभारला जाणार आहे. वर्षभर बौद्ध येथे येत राहतात परंतु दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन व १५ ऑक्टोबर रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध येथे बुद्ध व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात.