धनंजय कीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धनंजय कीर
जन्म २३ एप्रिल १९१३
रात्नागिरी

अनंत विठ्ठल कीर उर्फ धनंजय कीर' (जन्म : Ratnagiri, २३ एप्रिल १९१३, - इ.स. १९८४) हे चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. धनंजय कीर यांचा जन्म रत्‍नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्‍नागिरी येथील स्कूल ऑफ इंडस्ट्रीमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण काही काळ पटवर्धन हायस्कूलमध्ये होऊन ते रत्‍नागिरी हायस्कूलमधून मॅट्रिक झाले.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात २३ वर्षे नोकरी करून धनंजय कीर यांनी १९६२ च्या डिसेंबरमध्ये राजीनामा दिला. नोकरीत असताना त्यांनी 'फ्री हिंदुस्थान ' ह्या इंग्लिश साप्ताहिकात भारतीय नेत्यांची जी व्यक्तिचित्रे लिहिली ती खूप गाजली. त्यांनी लिहिलेल्या चरित्रात चरित्रनायकाचा व्यक्तिविकास, सत्यनिष्ठ व्यक्तिदर्शन व काळाचे हुबेहूब दर्शन घडते. त्यामुळे त्यांची चरित्रे स्वदेशात व परदेशांत लोकप्रिय झाली आहेत. भारत सरकारने त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्धल त्यांना 'पद्मभूषण' हा 'किताब देऊन त्यांचा यथार्थ गौरव केला आहे. शिवाय, नवनालन्दा महाविहार विद्यापीठाने १९७७ साली 'विध्यावारिधि' ही सन्मान्य पदवी देऊन, व कोल्हापूर विद्यापीठाने १९८० साली 'डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. [१]

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पाॅप्युलर प्रकाशन, १९६६)
 • डॉ. आंबेडकर: लाईफ ॲंन्ड मिशन (पाॅप्युलर प्रकाशन, १९५४)
 • महात्मा जोतीराव फुले (पाॅप्युलर प्रकाशन)
 • महात्मा फुले समग्र वाङ्मय - (संपादित). प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ
 • राजर्षी शाहू छत्रपती (पाॅप्युलर प्रकाशन)
 • महात्मा जोतीराव फुले : आमच्या समाजक्रांतीचे जनक
 • लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज : एक मूल्यमापन
 • स्वातंत्रवीर सावरकर
 • कृष्णराव अर्जुन केळुसकर : आत्मचरित्र व चारित्र (१८६० - १९३४)
 • लोकहितकर्ते बाबासाहेब बोले: (१८६९ - १९६१)
 • श्री नामदेव चरित्र, काव्य, आणि कार्य (इतर तीन लेखसंग्रह)
 • कृतज्ञ मी, कृतार्थ मी (आत्मचरित्र)
 • Veer Savarkar
 • Dr. Ambedkar: Life and Mission
 • Lokamanya Tilak: Father of the Indian Freedom Struggle
 • Mahatma Jotirao Phule: Father of Indian Social Revolutinon
 • Mahatma Gandhi: Political Saint and Unarmed Prophet
 • Shahu Chhatrapati: A Royal Revolutionary
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र (मराठी अनुवाद: गजानन सुर्वे) 1. ^ कीर, धनंजय (१९६८). महात्मा जोतीराव फुले. मुंबई: पॉप्युलर प्रकाशन. pp. मलपृष्ठ २. ISBN 978-81-7185-554-4.