यशोधरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
राजकन्या यशोधरा
Buddha with wife and son.jpg
बुद्धांसोबत यशोधरा आणि राहुल (डाव्या बाजूस तळाला), अंजिठा लेणी
मूळ नाव यशोधरा
जन्म इ.स.पू. ६ वे शतक
निर्वाण इ.स.पू. ५ वे शतक
गुरू गौतम बुद्ध
भाषा पाली
कार्य बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार
संबंधित तीर्थक्षेत्रे सांची
व्यवसाय राणी, नंतर भिक्खुणी
वडील राजा सुप्पबुद्ध
आई राणी पमिता
पती गौतम बुद्ध
अपत्ये राहुल
विशेष माहिती जगातील पहिल्या भिक्खूनींपैकी एक


राजकुमारी यशोधरा ही महान बौद्ध भिक्खूनी होती. यशोधरा ही राजा सुप्पबुद्ध आणि राणी पमिता यांची कन्या होती. यशोधरेची आई- पमिता राजा शुद्धोधनाची बहिण होती. वयाच्या १६ वर्षी राजकुमारी यशोधरेचा विवाह राजा शुद्धोधनाचे पुत्र राजकुमार सिद्धार्थ (गौतम बुद्ध) यांच्याशी झाला. यशोधरा व सिद्धार्थ गौतमाला राहुल नावाचा पुत्र झाला. नंतर राजकुमार सिद्धार्थ गौतमाने नंतर संन्यासी होऊन ज्ञान प्राप्त केले व बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. पतीच्या गृहत्यागानंतर यशोदरेने आपला मुलगा राहुलचे पालन पोषण केले. पती संन्यासी झाले म्हणून यशोधरेनेही मुल्यवान वस्त्रे, अलंकार त्यागून साधारण पण संत सारखे जगू लागली. राहुलने संघात प्रवेश केला. महाप्रजापती गौतमी समवेत यशोधरा बुद्धांकडून सर्वप्रथम महिला म्हणून धम्म दीक्षा घेऊन भिक्खूनी बनली आणि अरहंत या अत्युच्च पदापर्यंत जाऊन पोहोचली.

यशोधरेच्या जीवनावर आधारित अनेक लेखन व रचना झालेली आहे, त्यात मैथिलीशरण गुप्त यांची रचना मानी यशोधरा (हिंदी काव्य) खूप प्रसिद्ध आहे.