विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

=अक्कादेवीच्या माळावर रणधुमाळी होती. ब्रिटीशांनी चिरनेरच्या जंगलातील लाकडे तोडण्यास मनाई केल्याने पेटून उठलेल्या जनसामान्यांनी राजसत्तेला आव्हान दिल्याने हा आगडोंब उसळला होता...

25 सप्टेंबर 1930 चा तो दिवस स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदला आहे. अशिशिक्षत, अल्पशिक्षितांनी जंगलचा कायदा तोडण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी जंगल सत्याग्रहाच्या दिलेल्या हाकेला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देऊन हादरा दिला.

चिरनेर पंचक्रोशीतील चिरनेरसह, कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, भोम, धाकटी जुई, विंधणे, दिघोडे आदी गावातील ग्रामस्थांनी हक्काच्या जंगलावरील लाकडे तोडण्यास विरोध केल्याने भल्या पहाटे चिरनेर गाठले होते.

एका उंच झाडावर सत्याग्रहाचे रणशिंग फुंकल्याचे दाखविण्यासाठी तिरंगा फडकविल्यानंतर एकच हाहाकार उडाला. पोलिसांनी सत्याग्रहींवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात आठ सत्याग्रहींचा मृत्यू झाला. अनेक सत्याग्रही जखमी झाले.

विशेष म्हणजे सत्याग्रहात सहभागी झालेल्या वीरांप्रमाणेच रणरागीनींचाही तडाखा पोलिसांना बसला होता.